Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : पुढच्या आठवड्यात महापौर, उपमहापौर निवडणूक; अशी असेल प्रक्रिया

Share
administration directed to seal illegally held properties

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणूक पुढील आठवड्यात होणार आहे. विभागीय आयुक्तांनी पाठवलेल्या पत्रात निवडणुकीची तारीख पुढच्या शुक्रवारी (दि.२२)  जाहीर करण्यात आली आहे.

नाशिक महापालिकेसाठी  महापौर आरक्षण सर्वसाधारण उमेदवारासाठी खुले असून पुढील आठ दिवसांनी नाशिकला नवा महापौर आणि उपमहापौर मिळणार आहेत

नाशिकसह राज्यातील 27 महापालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत नुकतीच निघाली.  नाशिक महापालिका महापौरांची मुदत येत्या 15 डिसेंबर 2019 रोजी संपत आहे. महापौर रंजना भानसी यांची मुदत गेल्या 15 सप्टेंबर 2019 रोजी संपणार होती, मात्र विधानसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता लागु झाल्याने शासनाने राज्यातील मुदत संपणार्‍या महापौरांना तीन महिन्याची मुदत वाढवून देण्यात आली. आता पुढील महिन्यात ही मुदत संपणार असल्याने शासनाने महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर केली.

महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज वितरण उद्यापासून सुरु होईल. त्यानंतर अर्जांचा स्वीकार २० तारखेला सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत पार पडेल. या निवडणुकीसाठी निवडणुकीच्या दिवशीच सुरुवातीला अर्जाची छाननी आणि माघार होईल. त्यानंतर महापौर पदासाठी निवडणूक पार पडेल.

राज्यातील राजकीय उलथापालथीचे परिणाम नाशिक महापालिकेच्या महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीवर परिणाम बघायला मिळण्याची शक्यता आहे. महापालिकेत भाजपची सत्ता असली तरी राज्यात सध्या भाजपच्या विरोधात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची महाशिवआघाडी होण्याचे संकेत मिळत आहेत.

माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भाजपातील सानप समर्थक नगरसेवकांना हाताशी धरून शिवसेना महापालिकेत सत्ता स्थापनेचा दावा करू करण्याची शक्यता आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!