Type to search

Breaking News टेक्नोदूत नाशिक मार्केट बझ मुख्य बातम्या

नॅनोनंतर सामान्यांच्या खिशाला परवडणारी ‘क्युट’ बाजारात दाखल

Share

नाशिक : नॅनोनंतर नागरिकांच्या खिशाला परवडणारी सर्वात स्वस्त कार बाजारात दाखल झाली आहे. बजाज ऑटोने भारतातील सर्वात छोटी गाडी, Qute सादर केली आहे. रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने या गाडीला रस्त्यावर धावण्यासाठी परवानगी दिली आहे.

दरम्यान २००८ साली बजाज टाटाने सामान्यांच्या खिशाला परवडणारी, आकाराने लहान अशी नॅनो कार बाजारात आणली होती. त्यावेळी १ लाखाला उपलब्ध असणारी ही गाडी अनेकांनी खरेदी केली होती. मात्र हळूहळू या गाडीची क्रेझ कमी झाली, शेवटी २०१८ मध्ये या गाडीचे उत्पादन थांबवण्यात आले. त्यामुळे आता तीच क्रेझ पुन्हा अनुभवण्यासाठी बजाज ऑटोने नॅनोपेक्षाही छोटी कर लाँच केली आहे. लावरच ती रस्त्यावरही धावणार आहे.

या गाडीची वैशिष्ट्ये अशी कि, चालकांसह चार प्रवाशी सीट देण्यात आली आहे. मुख्य म्हणजे सर्व प्रवाशांसाठी सीट बेल्ट देखील पुरविण्यात आले आहेत. ही कार पेट्रोलसह सीएनजी व्हेरिअंटमध्येही उपलब्ध आहे.

पेट्रोल मोडमध्ये ही गाडी १३ पीएस पॉवर आणि १८.९ एनएम क्षमतेचा टॉर्क जनरेट करेल. तर सीएनजी मोडमध्ये ही गाडी १०.९८ पीएस पॉवर आणि १६.१ एनएम टॉर्क जनरेट करेल. या गाडीची लांबी २७५२ मिमी असेल, आणि वजन ४५१ एनएम असेल. या गाडीची किंमत २.४८ लाख पेट्रोल आणि सीएनजी व्हेरिअंटसाठी २.७८ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!