राज्य टेबल टेनिस स्पर्धांना सुरूवात

ऑलिम्पिकचे ध्येय ठेवा : कमलेश मेहता

0

नाशिक । दि. 8 प्रतिनिधी
ऑलिम्पिकचे ध्येय उराशी बाळगून खेळाडूंनी मार्गक्रमणा करावी असे आवाहन भारताचा ऑलम्पियन तथा अर्जुन पुरस्कार प्राप्त टेबल टेनिसपटू कमलेश मेहता यांनी येथे केले.

नाशिक जिमखाना येथे तिसर्‍या राज्य मानांकान टेबलटेनिस स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मेहता व उपस्थितांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बोलताना मेहता म्हणाले, टेबल टेनिस खेळ जगाच्या नकाश्यावर आता प्रथम क्रमांकावर आलेला आहे. खेळाचा प्रारंभ करताना प्रत्येक खेळाडूने स्वतसाठी नाही तर देशासाठी खेळण्याचे स्वप्न पहावे. खेळाडूंनी कठोर मेहनत करून आपले आणि आपल्या राज्याचे आणि देशाचे नाव उज्वल करावे असे सांगितले.

स्पर्धेच्या हॉल मध्ये यावर्षीच्या कॉमनवेल्थ गेम मधील सुवर्ण पदक विजेत्या नामांकित भारतीय टेबल टेनिस खेळाडूंचे फोटो लावल्याचे पाहुण ते म्हणाले, इतर ठिकाणी परदेशी खेळाडूंचे लावल्याचे नेहमी निदर्शनास येते या उपक्रमाबद्दल त्यांनी संयोजकांचे कौतुक केले.

प्रा.सुहास फरांदे म्हणाले, अश्या राज्य स्तरीय मोठ्या स्पर्धेचे आयोजन हे फार मोठी जबाबदारी असते त्या करताना संयोजकांनी योग्य ती काळजी घेतली त्या बद्दल संयोजकांचे कौतुक केले व तसेच राज्य संघटना जेवढी काळजी खेळाडू घडवताना घेतात तेवढीच काळजी त्यांच्या पुढील आयुष्याची जर घेतली तर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्टीय खेळाडू नक्कीच तयार होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष नरेंद्र छाजेड ह्यांनी केले, तसेच सर्वांचे आभार शेखर भंडारी ह्यांनी मानले. राज्य सरचिटणीस यतीन टिपणीस यांनी आपले मनोगत केले.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे राज्य प्रवक्ते सुहास फरांदे, महाराष्ट्र टेबल टेनिस असोसिएशनचे सरचिटणीस यतीन टिपणीस , स्पर्धा संयोजन समिती अध्यक्ष तथा छत्रपती पुरस्कार प्राप्त नरेंद्रजी छाजेड , राज्य संघटनेचे प्रकाश जसानी, सरचिटणीस शेखर भंडारी, राजेश भरवीरकर, संजय मोडक, प्रमुख पंच रोहित शिंदे , शिवछत्रपती पुरस्कार विजेते आनंद खरे, नितीन चौधरी, एच.डी.फ.सी बँकेचे चैतन्य डबीर, एकवीराचे वैभव जोशी, संजय मोडक, करण रौंदळ, संजय कोटेचा, पियुष चोपडा आदी मान्यवर , खेळाडू व पालकवर्ग उपस्थित होते.

या स्पर्धा 12 वेग वेगळ्या वयोगटात खेळविल्या जात असून आज पासून पुरुष – महिला गट , युथ मुले-मुली गट या गटांचा प्राथमिक फेरी च्या सामान्याना सुरवात झाली. यामध्ये ठाण्याच्या खेळाडूंनी वर्चस्व राखले.

नाशिकच्या अनुष्काचा धक्का
युथ मुलीच्या गटात बिगर मानांकित नाशिकच्या अनुष्का चव्हाणने अत्यंत चुरशीच्या लढतीत चवथे मानांकन असलेल्या ठाण्याच्या स्नेहल पाटीलचा धक्कादायक पराभव करून खळबळ उडवून दिली अनुष्का चव्हाणने पाहिले दोन सेट 11-06 असा जिंकून आघाडी घेतली. दुसर्‍या सेटमध्ये स्नेहलने चांगली लढत दिली. परंतु अनुष्काने हा सेटही 13-11 असा जिंकून 2-0 अशी आघाडी मिळविली. तिसर्‍या सेटमध्ये मात्र स्नेहलने 12 -10 असा सेट जिंकून चुरस निर्माण केली. अनुष्काने चवथ्या सेटमध्ये जिद्दीने खेळ करत हा सेट 11 विरुद्ध 8 असा जिंकून हा सामना 4-1 ने जिंकत विजय मिळविला.

आजचे निकाल असे
सिद्धेश पांडे (ठाणे) वि.वि. जश दळवी(ठाणे) 11-4, 11-7 व 11-4
तेजस कांबळे (ठाणे) वि.वि. प्रथमेश पारकर (ठाणे) 11-7, 11-8 व 11-8
दीप्ती पाटील (ठाणे) वि. वि. तन्मय राणे (मुंबई शहर ) 8-11, 11-4, 11-4, 9-11 व 11-4
अश्विन सुब्रमण्यन (मुंबई उपनगर ) वि. वि. आर्य सेठी (पुणे) 11-8, 11-6 व 11-6
युगांध झेंडे (ठाणे) वि. वि. विराज कोटेचा (नाशिक ) 10-12, 11-6, 8-11, 11-6 व 11-5
मंदार हळदीकर (मुंबई उपनगर) वि. वि. करण कुकरेजा (पुणे) 11-8, 11-8 व 11-5

युथ गर्ल्स
1) अनुष्का चव्हाण(नाशिक )वि. वि.स्नेहल पाटील (ठाणे) 11-06, 13-11, 10-123, 11-08
2) पूजा जोरवार (पुणे )वि.वि. अनुजा झंवर (नाशिक ) 13-11, 11-7,09-11 व 11-8
3) मनुश्री पाटील (मुंबई उपनगर )वि.वि. साक्षी अफजलपूरकर (नाशिक ) 13-11, 11-7, 11-

LEAVE A REPLY

*