राष्ट्रवादीच्या मद्यधुंद पदाधिकाऱ्याची पोलीस अधिकाऱ्यांना धक्काबुक्की

0

नाशिक (प्रतिनिधी) ता. ३ : गस्तीवर असलेल्या पंचवटी पोलिस ठाण्याच्या बिट मार्शल आणि शिपायासह पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांना मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक मध्य विधानसभा अध्यक्ष धीरज मगर (३२, रा. हिरावाडी रोड, पंचवटी) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान आज त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की हिरावाडी परिसरातील एसएसडी नगर भागात काल दिनांक २ ऑगस्ट रोजी रात्री दीडच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना गस्तीवरील बीट मार्शल संदिप पोटींदे आणि पोलिस शिपाई शेळके यांना एका सोसायटीच्या ठिकाणी अंधारात संशयित धीरज मगर संशयास्पद रित्या दिला. त्याला हटकले असता त्याने पोलिसांना शिवीगाळ केली. त्याच्या तोंडला मद्याचा उग्र दर्प येत होता.

दरम्यान त्यानंतर आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनीही त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांच्यासोबतही त्याने अरेरावी आणि शिवीगाळ केली.

त्यामुळे पुढे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पंचवटी पोलिस ठाण्यात आणले असता तेथे त्याने प्रचंड गोंधळ आणि आरडाओरड करत कर्तव्यावर असलेल्या पोलिस निरीक्षक श्री. ढमाळ आणि पोलिस उपनिरीक्षक श्री. मुंढे धक्काबुक्की करत शिवीगाळ केली.

पोलिसांनी समजावून सांगूनही तो ऐकण्याच्या स्थितीत नव्हता, त्याची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तो मद्याच्या अमलाखाली असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अहवाल दिला.

त्यामुळे त्याच्यावर बीट मार्शल यांच्या तक्रारीवरून शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा व इतर कलमांसह गुन्हा नोंदवून त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले.

 

LEAVE A REPLY

*