रिक्षाचालकाची गुंडगिरी; नातीचा विनयभंग; आजीच्या अंगावर रिक्षा 

1

नाशिक । दि. 18 प्रतिनिधी

घरी येऊन नातीची छेड काढणार्‍या रिक्षावाल्याला जाब विचारणार्‍या आजीच्या अंगावर रिक्षा घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरकान इस्माईल पठाण, सनी इंगळे व त्यांचे इतर साथीदार (सर्व रा. सिन्नर फाटा, नाशिकरोड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे ओहत.

नाशिकरोडच्या  जय भवानी रोड परिसरात राहणार्‍या पीडितेने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शुक्रवारी (दि.17) रात्री 9 वाजता ती आजी-आजोबांसह घरी असताना संशयित त्यांच्या घराजवळ आले होते.

यातील आरकान याने तिचा हात धरून तिचा विनयभंग केला. यावेळी घरात असलेल्या आजीच्या हा प्रकार लक्षात आला. आजीने त्या दोघांनाही याचा जाब विचारत त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला.

यावेळी संशयीतांंनी बरोबर आणलेल्या रिक्षात बसून पळ काढला; मात्र आजीने त्यांच्यामागे जाऊन त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता आजीच्या अंगावर रिक्षा घालून तिला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

यामध्ये आजीच्या हातापायावरून रिक्षाचे चाक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध विनयभंग व प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगधने करीत आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

*