मनमाडला इंजिन घसरले; मोठा अपघात टळला

0

मनमाड (प्रतिनिधी) ता. ११ : शंटिंग करतांना रेल्वे इंजिन डेड एंडची भिंत तोडून रुळा वरून खाली घसरल्याची घटना मनमाड रेल्वे स्थानका जवळ घडली.

ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्याला खेटूनच मुंबईकडे जाणारा मुख्य रेल्वे लाईन आहे. मात्र त्याच्या पासून काही अंतरावर इंजिन थांबल्यामुळे मोठा अपघात टळला

या बाबत अधिक वृत्त असें की दोन इंजिन लूप लाईनला जात असताना डेड एन्डच्या भिंतीचा अंतर ड्रायव्हरच्या लक्षात न आल्यामुळे इंजिन भिंत तोडून त्याचे पुढचे चाक रुळावरून खाली आले.

अचानक घडलेल्या या घटनेमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांची धांदल उडाली व त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.तिसरं इंजिन लावून घसरले इंजिन पुन्हा रुळावर आणण्यात आले.

ज्या ठिकाणी हा अपघात घडला त्याला खेटून मुंबईकडे जाणारी रेल्वे लाईन असून जर इंजिन आणखी जास्त पुढे गेला असता तर तो त्या लाईनवर जाऊन पडला असता आणि मोठा अनर्थ झाला असता मात्र हा अनर्थ टळला.

LEAVE A REPLY

*