Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

भाकरीच्या तुकड्यापायी जीव दोरीला टांगला; खेळ डोंबार्याचा हा शाळाबाहीर मांडला

Share

बेलगाव कुऱ्हे । लक्ष्मण सोनवणे : १४ वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांना शासनाने सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केलेला असल्याने शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता स्तरावर घेतली जात आहे. शासन अगदी शाळाबाह्य विद्यार्थ्यांना वयानुसार योग्य त्या इयत्तेत घालण्याची काळजी घेत असतांना पोटाची खळगी भरण्यासाठी चिमुकले मुले आपला जीव दोरीवर टांगून जीवनाशी संघर्ष करीत आहेत.

आजही अनेक ठिकाणी हा डोंबार्याचा खेळ पाहावयास मिळतो. सक्तीचे मोफत शिक्षण केले असले. तरी या पिलांना आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून हे काम करावेच लागते. परिणामी लहानपानपासूनच या खेळाची सवय होऊन पुढे शिक्षणाचा मार्ग न मिळाल्याने हेच आयुष्य बनून जात. याचाच प्रत्यय दोरीवर आपला जीव टांगणीला लावणाऱ्या चिमुकल्या मुलीच्या रुपाने आला. गावो-गाव भटकणारे डोंबारी कुटुंब पोटासाठी संघर्ष करीत आहेत. सक्तीच्या शिक्षणाचा कायदा याची सुतराम माहिती चिमुकल्यांसह पालकांना माहिती नाही.

गावो गावी कसरतीचे खेळ दाखवित पैसे मिळविणे व पोट भरणे हाच त्यांच्या आयुष्याचा नित्यनेम. शहरातल्या तसेच सुज्ञ पालक असलेल्या घरात जन्मलेल्या मुलांना या खेळाशी काडीमात्र संबंध नसतो. त्यांच्या जीवनात अशाप्रकारच्या हालअपेष्टा माहीतही होत नाही. परिणामाची योग्य शिक्षण मिळाल्याने ही मुले हुशार होतात. परंतु डोंबाऱ्याचा खेळ करणारी मुले या सर्वांपासून वंचित राहतात. परिणामी अशा सुख सुविधांपासून त्यांना मुकावे लागते. अन साहजिकच दोरीचा सहारा घेऊन आपले जीवन व्यतीत करावे लागते.

आजही शासन समाजातील तळागाळातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अनेक उपक्रम राबविताना दिसत आहे. परंतु या मुलांना प्रवाहात आणण्यासाठी अनेक कष्ट घ्यावे लागतात. या मुलांचे सतत स्थलांतर होत असल्याने त्यांना एका ठिकाणी शाळा ही साजेशी नसते. आज अनेक ठिकाणी डोंबारी दिसून येतात. आपल्या तोडकंमोडक संसार घेऊन असह्य जीवन जगताना दिसतात. मिळेल त्याठिकाणी रस्त्यावर मांडलेल्या संसारात तीन विटांची चूल अन त्या जोडीला तुटक्या फुटक्या संसारपयोगी वस्तू अशा अवस्थेत भाकरीच्या अर्ध्या चंद्रासाठी भटकंती करीत आहेत.

या सर्वाना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. कारण या योजना त्यांच्यापर्यंत पोहचणे आवश्यक असून त्यांना आपुलकीची भावना मनात निर्माण व्हायला हवी. जेणेकरून सरकारबाबत उदासीनता कमी होईल आणि डोंबाऱ्याचा खेळ नावापुरता राहील.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!