Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिकमधील पोषण अभियानाचे मन कि बातमध्ये मोदींकडून कौतुक

Share

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी कुपोषण रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील नाशिकमध्ये सुरू केलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. नाशिकमध्ये पोषण अभियान जोर धरत असून २०२२ पर्यंत देश कुपोषणमुक्त करण्याचं सरकारचा मानस असल्याचे त्यांनी मन कि बात मध्ये सांगितले.

दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी आज मन कि बातमधून देशभरातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्वच्छता अभियान, मॅन व्हर्सेस वाईल्ड, गांधी जयंती, सण उत्सव या संदर्भात लोकांना संबोधित केले. तसेच नाशिकमध्ये पोषण आहार ही मोहीम चांगल्या पद्धतीने राबत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

‘मूठभर धान्य’ हा उपक्रम नाशिकमध्ये राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत पीक कापणीच्या काळात अंगणवाडी सेविका कामगार लोकांकडून मूठभर तांदळाचे धान्य गोळा करतात. हे धान्य नवजात मुलं तसेच स्रियांसाठी वापरले जाते. दरम्यान यामुळे नाशिक जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे. त्यामुळे ही संकल्पना संपूर्ण सप्टेंबर महिना ‘पोषण अभियान’ म्हणून राबविणार असल्याचे मोदी यांनी सांगितले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!