वाघदर्डीने तळ गाठल्याने मनमाडकर पाण्यासाठी रस्त्यावर

0

मनमाड प्रतिनिधी : मनमाडला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाने तळ गाठल्यामुळे शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून अनेक भागात गेल्या २० दिवसा पासून पाणी पुरवठा झाला नाही त्यामुळे नागरिक आता रस्त्यावर उतरू लागले आहे.

पाणी टंचाईने हैराण झालेल्या श्रावस्ती नगर भागातील महिलांनी आज (मंगळवार) या भागातील नगरसेविका अर्चना जाधव यांच्या नेतृताखाली पालिकेवर हंडा मोर्चा काढला. यावेळी संतप्त महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना निवेदन दिले त्यात नवीन पाईप लाईन टाकण्यात यावी. सुरळीतपणे पाणी पुरवठा करण्यात यावा अशा मागण्या करण्यात आल्या

 मनमाड शहराचा विकास झाला नसला तरी विस्तार मात्र मोठ्या प्रमाणात होऊन अनेक नवीन वसाहती निर्माण झाल्या आहेत त्यापैकी एक श्रावस्ती नगर असून सुमारे ४ हजार पेक्षा जास्त नागरिक या भागात राहतात मात्र या नगर मध्ये अद्यापही पाण्याची पाईप लाईन टाकण्यात आलेली नाही.

त्यामुळे बोरवेलच्या पाण्यावर नागरिक तहान भागवत होते परंतु यंदा शहर परिसरात दमदार पाऊस न झाल्यामुळे भूमिगत पाण्याची पातळी झपाट्याने कमी होऊन बोरवेल बंद पडू लागले आहे त्यामुळे बोरवेलवर अवलंबून असलेल्या श्रावस्ती नगरसह इतर काही भागातील नागरिकांना देखील भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत असल्याने या भागातील महिलांनी नगरसेविका अर्चना जाधव यांच्या नेतृताखाली पालिकेवर हंडा मोर्चा काढला होता.

यावेळी महिलांनी पाणी पुरवठा अधिकारी शामकांत जाधव यांना एक निवेदन दिले असून त्यात श्रावस्ती नगर भागात पाईप लाईन टाकून सुरळीतपणे पाणी पुरवठा करण्याची मागणी केली.पाईप लाईन टाकण्यासाठी पालिका प्रशानाने निविदा काढली होती ती मंजूर ही झालेली आहे.

त्यामुळे लवकरच पाईप लाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे जाधव यांनी सांगून तो पर्यंत तैन्कर ने पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन महिलांना दिले यावेळी माजी नगरसेवक संजय निकम, पालिकेचे अजहर शेख,दीपक पांडे यांच्यासह श्रावस्ती नगर भागातील महिला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*