मनमाड : नगर-इंदूर महामार्गावर बस उलटली; १८ प्रवाशी जखमी
Share

मनमाड : पुणे येथून अक्कलकुवाकडे जाणाऱ्या एसटी बसला मनमाड जवळ नगर-इंदूर महामार्गावर पहाटे अपघात झाला असून त्यात १५ ते १८ प्रवासी जखमी झाले आहे. जखमींना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी (दि. १०) पहाटे हा अपघात घडला.
दरम्यान खड्डा चुकविण्याच्या नादात हा अपघात घडला असून ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे एसटी उलटली. बसमध्ये सुमारे ४० प्रवासी होते. अपघात झाल्यानंतर प्रवाशांनी आरडाओरडा केल्यामुळे अनकवाड़े गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना काढले बाहेर काढले.
प्रवाशांना किरकोळ मार लागला असून सुदैवाने जीवित हानी झाली नाही. नगर-मनमाड महामार्गावर मोठ्या प्रमाणात झाले खड्डे झाले असल्याने एका प्रकारे हा मार्ग मृत्यूचा सापळा असून खड्ड्यामुळे रोज अपघात होत आहे