Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

PhotoGallery : मनमाड शहरात पावसाचे जोरदार आगमन; अनेक घरांची पडझड

Share

मनमाड प्रतिनिधी : मान्सूनच्या पावसाने आज मनमाड शहर परिसराला अक्षरशः झोडपून काढले. काही यावेळी गारा देखील पडल्या.पावसा सोबत वादळी वारा इतका जोरात होता की त्याने ठिकठिकाणी झाडे जमीनदोस्त केली.अनेक घरांचे छप्पर उडून गेली तर काही घरांची पडझड झाली. विजेचे खांब कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता.

पाऊस,गारपीट व वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी मात्र जीवित हानी कुठेही झालेली नाही. अचानक आलेल्या पावसामुळे बाजार पेठेत आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली होती. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे गेल्या तीन महिन्यापासून जीवघेण्या उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

गेल्या वर्षीही मनमाडसह या भागात ७ जून रोजी पावसाचे आगमन झाले होते मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली होती त्यामुळे लोकांना भीषण पाणी टंचाईला तोंड दयावे लागले आज यावर्षी देखील ७ जूनला पावसाने हजेरी लावली मात्र पुन्हा गेल्या वर्षी प्रमाणे पावसाने दडी मारली तर याची चिंता सर्वांना भेडसावत आहे.

गेल्या काही दिवसा पासून शहर परिसरात ढगाळ वातावरण होते. आज सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली सुरवातीला पावसाच्या तुरळक सरी पडल्या. मात्र त्यानंतर पावसाचा जोर वाढला आणि पाहता-पाहता जोरदार पावसाने अर्धा तास शहराला झोडपून काढले. वादळी वाऱ्याचा वेग मोठा होता त्यामुळे शहरातील अनेक भागात झाडे उन्मळून पडली. यावेळी काही ठिकाणी घरांचे छप्पर उडाली तर विविध भागात घरांची पडझड झाली. रेल्वे रुळावर देखील एक झाड पडले होते मात्र रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेवून झाड बाजूला केल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर काहीही परिणाम झाला नाही.

 

गेल्या वर्षीही मनमाडसह या भागात ७ जून रोजी पावसाचे आगमन झाले होते, मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली होती. त्यामुळे लोकांना भीषण पाणी टंचाईला तोंड दयावे लागले. आज यावर्षी देखील ७ जूनला पावसाने हजेरी लावली. मात्र पुन्हा गेल्या वर्षी प्रमाणे पावसाने दडी मारली तर याची चिंता सर्वांना भेडसावत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!