Type to search

नाशिक

मनमाड रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे पाकीट मारणारा चोरटा जेरबंद

Share

मनमाड (प्रतिनिधी) : रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे असलेल्या प्रवाशांचे पाकीट मारणाऱ्या चोरट्याला जेरबंद करण्यात रेल्वे सुरक्षा बलाला (आरपीएफ) यश आले असून हा चोरटा प्रवाशाचे पाकीट मारताना पकडला गेला.

यावेळी चोरटा हा प्रवाशाचे पाकीट मारत असताना सीसीटीव्हीत कैद झाल्याने आरपीएफ जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून त्याला ताब्यात घेत त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. सदर चोरटा हा सराईत गुन्हेगार असण्याची शक्यता असून त्याने या अगोदर किती चोऱ्या केल्या याचा आरपीएफ तपास करीत आहे

या बाबत माहिती देतांना रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक के.डी.मोरे म्हणाले कि आरपीएफ जवान आर.एम.शिंदे रेल्वे स्थानकावर असलेल्या सीसीटीव्हीच्या मॉनेट्रेनीग रूम मध्ये ड्युटी करीत असताना त्यांना तिकीट काढण्यासाठी बुकिंग कार्यलयाच्या खिडकी जवळ रांगेत उभे असलेल्या प्रवाशाच्या खिशातून एक जण पाकीट मारत असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी नारायण शिरसाट या आरपीएफ जवानाला सोबत घेवून घटनास्थळी धाव घेवून चोरट्याला पकडले.

त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे चोरलेले पाकीट सापडले. पकडण्यात आलेल्या चोरट्याचे नाव फजल खान असून तो मनमाडच्या रमाबाई नगर भागातील राहणारा आहे. पकडल्यानंतर त्याला रेल्वे पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!