Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

मनमाड : ऐन दिवाळीच्या तोंडावर पावसाने केला घात; पिकांचे प्रचंड नुकसान

Share

मनमाड : परतीच्या पावसाने मनमाड शहर परिसरात शनिवारी रात्री पासून धुमाकूळ घातला असून आज (रविवार) दिवसभर देखील पाऊस सुरूच होता त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले तर आज भरणाऱ्या आठवडे बाजारावर देखील पावसाचा परिणाम झाला.

दरम्यान या जोरदार पावसाचा फटका हा पिकांना देखील बसला असून परिसरातीच्या अनेक गावातील शेतात काढून ठेवलेला मका, बाजरी सोबत कांद्याच्या रोपाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे बळीराजा पुन्हा संकटात सापडला असून नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

गेल्या १५ दिवसा पासून पावसाने विश्रांती घेतली त्यामुळे माळेगाव कर्यात, सटाणा, बेजगाव, वंजारवाडी, नागपूर, पानेवाडी, भालूर, अस्तगाव, खादगाव यासह इतर गावातील शेतकऱ्यांनी मका, बाजरी काढण्यास सुरुवात केली होती. अनेक शेतकऱ्यांनी तर शनिवारी सकाळी मका, बाजरीची सोंगणी केली तर काहींनी कांदा रोपांची नुकतीच लागवड केली. मात्र अचानक सायंकाळी पावसाला सुरुवात त्यानंतर शनिवार, रविवार दिवसभर पाऊस सुरु होता.जोरदार पावसामुळे शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाले त्यामुळे काढून ठेवलेला मका व बाजरी भिजून खराब झाली तर कांदा रोपांचे ही मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला असून नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

रविवारी मनमाडचा आठवडे बाजार असतो. मात्र दिवसभर सुरु असलेल्या पावसाने या बाजारात होणाऱ्या व्यवहारावर पाणी फेरले. गेल्या कहो दिवसा पासून तापमानात देखील वाढ होऊन पारा ३१ अंश सेल्सियस पर्यंत गेला होता. त्यामुळे अक्टोबर हिट मुळे नागरीका हैराण झाले होते. पावसामुळे हवेत गारवा निर्माण होऊन तापमानात मोठी घट झाली असल्याने उकाड्याने हैराण झालेल्यांना काहीसा दिलासा मिळाला.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!