Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

मनमाड : गोदावरी एक्सप्रेसमध्ये आगळावेगळा गणेशोत्सव

Share

मनमाड : गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषात आज (सोमवार) मनमाड शहर परिसरात विघ्नहर्त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले घरा-घरासह पोलिसांची अधिकृत परवानगी घेवून सुमारे १४३ सार्जनिक गणेश मंडळांनी बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. काहींनी वाजत गाजत ढोल ताशे वाजवत मिरवणूक काढून तर काहींनी साध्या पद्धतीने गणपतीची स्थापना केली.

गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही पावसा अभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचे सावट गणेश उत्सवावर जाणवत होते.दर वर्षी प्रमाणे यंदा ही सर्व सर्वधर्मीय चाकरमाण्यानी देखील मनमाड-कुर्ला गोदावरी एक्सप्रेसमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना उत्सवाच्या वातावरणात केली.तर नेहमी प्रमाणे शहराचे आराध्यदैवत मानले जाणारे नीलमणी गणेश मंडळाने यंदा ही गणरायाच्या मूर्तीला पालखीत विराजमान करून पुणेरी पद्धतीने मिरवणूक काढली होती.

मनमाड,नांदगाव येथून मोठ्या संख्येने नोकरदार, व्यापारी,विद्यार्थी गोदावरी एक्स्प्रेस ने नाशिक, मुंबईकडे अप-डाऊन करतात गणेशोत्सव काळात सर्व चाकरमानी घराबाहेर असतात त्यांनाही गणेशोत्सवाचा आनंद साजरा करता यावा तसेच प्रवासात कोणतेही विघ्न कधी ही येऊ नये, जातीय सलोखा आणखी दृढ व्हावा यावा उद्देशाने १९९६ साली हिंदू-मुस्लीम चाकरमान्यांनी एकत्र येऊन गोदावरी एक्स्प्रेस सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना केली तेंव्हा पासून आज पर्यंत गेल्या २३ वर्षा पासून गोदावरी एक्स्प्रेस मध्ये अविरत बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात आहे.

यासाठी पास बोगीची आकर्षक पद्धतीने सजावट करण्यात आली होती.सकाळची आरती मनमाडला तर सायंकाळची आरती नाशिकरोडला केली जाते आज पहिली आरती नगराध्यक्षा पद्मावती धात्रक,माजी आमदार जगन्नाथ धात्रक यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र भडके,उपाध्यक्ष प्रवीण व्यवहारे,सचिव सुरज चौधरी, विशाल आहिरे, गोरख खैरे, धृमील शेलार, निलेश सिरसाठ आदीसह इतर कार्यकर्ते व चाकरमाने उपस्थित होते. आरती नंतर गाडीतील सर्व प्रवाशांना प्रसाद वाटप करण्याची प्रथा आहे.

गोदावरी एक्स्प्रेसमध्ये साजरा होणारया या आगळ्या – वेगळ्या गणेशोत्सवाची मनमाड- मुंबई दरम्यानच्या रेल्वे स्थानका बरोबरच राज्यभर ख्याती आहे. तिकडे दर वर्षी प्रमाणे यंदा ही नीलमणी गणेश मंडळाने पुणेरी पद्धतीने वाजत गाजत गणरायाची मिरवणूक काढली होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!