Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

मनमाड : अंगावर भिंत पडल्याने मजुराचा मृत्यू

Share

मनमाड । प्रतिनिधी : भिंत पडून तिच्या खाली दबून एका मजुराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज (दि.०७ ) मनमाड पासून जवळ नागापूर परिसरात असलेल्या इंडियन ऑइल कँपनीच्या इंधन प्रकल्पात घडली. या घटनेमुळे प्रकल्पातील कामगार व मजुरा मध्ये खळबळ उडाली असून मयत झालेला मजूर हा आंध्रप्रदेशातील असून त्याच्या पाठीशी कोणीही नसल्याने हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा या परिसरात होती.

या बाबत सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार मनमाड पासून 4 किमी अंतरावर इंडियन ऑयल कंपनीचा इंधन प्रकल्प सूत्रांनी दिलेल्या असून त्यातून रोज शेकडो टैंकरच्या माध्यमातून राज्यातील पेट्रोल पंपावर पेट्रोल-डीझेलचा पुरवठा केला जातो.

सध्या या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात बांधकाम केले जात असून त्यासाठी इतर राज्यातील मोठ्या संख्येने मजूर काम करीत आहे. आंध्रप्रदेशातील व्यंकटराव वडरु व त्याचा मुलगा राजेश वडरु (वय,२२ ) हे दोघे ही काम करीत होते.

आज सकाळी जेसीबीने प्रकल्पातील जुनी भिंत पाडली जात असताना त्याखाली सापडून राजेशचा मृत्यू झाला. आपल्या डोळ्या देखत तरुण मुलाचा मृत्यु झाल्याचे पाहून वडिलांवर आभाळ कोसळले आहे.

या तरुणाच्या कुटुंबियाला भरपाई देण्यात यावी अशी मागणी इतर मजुरांनी केली मात्र त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे बोलेले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!