Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

मनमाड : उपजिल्हारुग्णालयातील दोन डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात

Share

मनमाड : येथील उपजिल्हा रुग्णालयातील दोन डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात अडकले असून स्त्रीरोग तज्ञ एस.एस.पोद्दार व कक्ष सहायक प्रवीण राठोड यांना तीन हजार रुपयांची लाच घेतांना नाशिकच्या एसीबी पथकाने रंगे हात पकडले.

अधिक माहिती अशी कि, बाळंतपणासाठी दाखल झालेल्या महिलेचे सिजर करण्यासाठी डॉ. पोद्दार यांनी सात हजार रुपयांची मागणी केली होती. शस्रक्रिया झाल्यानंतर रक्कम देण्याचे ठरले होते.

सदर महिलेच्या नातेवाईकांनी नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधल्या नंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला आणि ठरलेल्या ७ हजार पैकी तीन हजार रुपयाची लाच घेताना डॉक्टर पोद्दार आणि कक्ष सहायक राठोड यांना रंगे हात पकडण्यात आले

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!