Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video: धावती रेल्वे पकडताना अपघात पण ‘देव तरी त्याला कोण मारी’

Share

मनमाड : देव तारी त्याला कोण मारी असाच काहीसा प्रत्यय आज मनमाड रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना आला असून धावती रेल्वे पकडत असताना एक तरुण गाडीखाली सापडल्याने थोडक्यात बचावला. मुनीर करीम बागवान (वय ३०) असे या तरुणाचे नाव आहे.

अधिक माहिती अशी कि, मुनीर करीम बागवान (वय ३०) हा तरुण परभणी येथून कल्याणाला जात होता. औरंगाबादहुन आलेली गाडी मनमाडला थांबली असतांना या तरुणास एका व्यक्तीने सांगितले कि कल्याण जाणारी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर थांबली आहे. यावेळी गाडी सुरु झाली होती.

धावती गाडी पकडण्याचा प्रयत्न करीत असताना तो खाली पडला. गाडी व प्लॉट फार्मच्या मध्ये अडकून फरफटत जात असताना ड्युटीवर तैनात आलेला आरपीएफ जवान मनीष कुमार सिंग याने तातडीने धाव घेवून या प्रवाशाला बाहेर ओढून काढले. यामध्ये त्याच्या दोन्ही पायांना दुखापत झाली.

यानंतर त्यास प्राथमिक उपचार करण्यात आले. दरम्यान या तरुणाने प्राण वाचविणाऱ्या आरपीएफ जवानाचे आभार मानले. तो दुसऱ्या गाडीने कल्याणकडे रवाना झाला.

आरपीएफ मनीष कुमार सिंगने प्रवाशाचा जीव वाचविल्यामुळे आरपीएफ इंस्पेक्टर डी.लकडा, सहायक निरीक्षक वर्मा, तिवारी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत स्टेशन मास्तर गलांडे, सिटीआय कांबळे, मुख्य वाणिज्य निरीक्षक नाना भालेराव यांनी त्याचे अभिनंदन केले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!