Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

उन्हाळी कांदा साठवणूकीसाठी शेतकऱ्यांची धावपळ

Share

वासोळ वार्ताहर : सध्या उन्हाळी कांदा साठवूक शेतकरी जोमाने करीत आहेत.शेतकऱ्यांनी यंदा गिरणा नदीकाठावरील गावांनी मोठ्या कष्टाने दुष्काळावर मात करून कांदा पिकविला आहे . कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आपला कांदा चाळीमध्ये साठवताना दिसून येत आहेत.

यंदा कांद्याचे उत्पादनही घातल्याचा जाणकारांचा अंदाज असल्याने शेतकरी वर्ग भविष्यातील कांदा दरवाढीच्या अपेक्षेने साठवणुकीस प्राधान्य देत आहेत. गतवर्षी कांद्याला कवडीमोल भाव असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या कांद्याच्या चाळी फोडल्याहि नव्हत्या.

चाळीमधेच मोठ्या प्रमाणात कांदा सडल्याने शेतकरी वर्गाला उत्पादन खर्चावढाही भाव मिळाला नाही. कसमादे परिसराचे कांदा पिकावरच आर्थिक गणित असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या वर्षी कांद्याला चांगला भाव मिळेल या अपेक्षेणे शेतकरी धावपळ करत आपला कांदा चाळीत साठवत आहेत.

शेतकऱ्यांना लागवडीपासून ते चाळ भरण्यापर्यंत मोठ्या खर्चाला सामोरे जावे लागले आहे. गिरणा नदीकाठावरील लोहोणेर,वासोळ,महालपाटने,आदि परिसरात उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली असली तरी तालुक्यातील बहुतांश भागात उन्हाळी कांद्याची लागवड झालेली नाही. काढणीस आलेला कांदा काढणीस माजुरांचेही बऱ्याच प्रमाणात वाहतूक होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!