Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

महिलांमध्ये नेल आर्टची वाढती क्रेज

Share

नाशिक | पूजा गोरे

सध्या सगळ्यांना सगळीकडेच नक्षीकाम कोरीवकाम बघायला आवडते. घर,मंदिर,हॉटेल बरोबरच आता शरीराच्या कुठल्याही अवयवावर नक्षीकाम किवा कोरिवकाम करुन घेता येते.त्यामधे नखांना फक्त नेलपेंट न लावता त्यावर नक्षीकाम करण्याचा ट्रेंड प्रचलित झाला आहे. आकर्षक रंग आणि डिझाइन्स वापरून नखांवर केलेली ही कलाकुसर सगळ्यांनाच भुरळ पाडते .

नेल आर्ट आपण घरी पण करु शकतो आणि पार्लर मधे जाऊन अगदी ५०० ते १०००० ,१५००० पर्यन्तचे नेल आर्ट करुन घेता येते.सोशल मीडिया साइट्‌सवरुन नेल आर्टचे डिजाईन बघून अनेक तरुणी घरच्या घरी देखील नेल आर्ट करून बघतात. तसेच कंप्यूटरवर एखादी डिज़ाइन तयार करुन आपली नखे नेल आर्टच्या मशीन मधे टाकून आपल्या नखावर ती नक्षी प्रिंट होते. अशी प्रगत मशीनरी बाजारात आता उपलब्ध झाली आहे.

कमी खर्चात एखाद्या प्रोफेशनलव्यक्ति कडून करून घेतात तसं नेल आर्ट करून घ्यायचं असेल तर नेल स्टिकर्स’चा पर्याय बाजारात उपलब्ध आहे. या पद्धतीच कोणतीही खटपट न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीनं नेल आर्ट आपण घरबसल्या देखील करु शकतो.सध्या या स्टिकर्सवर इंग्लिश अक्षरांचा किंवा शब्द असलेल्या प्रिंटचा ट्रेंड सुरू आहे.

मध्यंतरी नखांना फ्रेंच शेप देण्याचा क्रेझ होता, पण कोणतीही स्टाइल खूप दिवस टिकट नाही त्यामुळे सध्या नखांना ओव्हल शेप देण्याचा ट्रेण्ड इन आहे.नेल आर्ट करण्यासाठी नेलआर्ट किट आणि वेगवेगळे ब्रश,पेन अशी अनेक साधने उपलब्ध आहेत.नेल आर्ट बरोबरच नेल एक्सटेंशन म्हणजेच खोटे नेल्स लाउन त्यावर नेलआर्ट करण्याचाही ट्रेंड सध्या प्रचलित आहे.

पोल्का डॉट्स डिजाइन.
फ्रेंच नेल आर्ट, फूटी फ्रेश डिजाइन, ट्राई कलर क्लीफ डिजाइन, वाटर मार्बल डिजाइन, स्वीट डेजर्ट डिजाइन, बॉ नेल डिजाइन हे नेल आर्ट चे प्रकार आहेत.

सध्या किटी पार्टीज किवा जनरलच पार्टीजच प्रमाण वाढले आहे अणि त्यामधे सगळ्याच स्त्रीयांना सुंदर दिसायच असत.आणि त्यासाठी अनेक स्त्रिया नेल आर्ट करुन आपली एक वेगळीच अदा दाखवताना दिसतात. आता या प्रकाराला खुप डिमांड आहे असे नेल आर्ट स्पेशलिस्ट मेघा पाटिल यांनी सांगितले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!