Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

घोटी-सिन्नर महामार्गावर भीषण अपघातात दोन ठार

Share

त्र्यंबक जाधव । प्रतिनिधी

इगतपुरी तालुक्यातील घोटी सिन्नर महामार्गावर शेणीत शिवारातील कोठुळे पेट्रोल पंपावर आज बारा वाजेच्या दरम्यान टँकर व मोटरसायकल यांच्यात समोरासमोर भीषण अपघात होवून दोन जण जागीच ठार झाले आहे.

सविस्तर वृत्त असे की, एमएच ४३ वाय ८९२३ या क्रमांकाचा डांबर घेवून जाणारा टँकर घोटी कडून सिन्नरच्या दिशेने जात होता तर एमएच १५ डीएक्स ३०४३ या क्रमांकाची दुचाकी असलेली दैंनदिन काम आटोपून सिन्नर भागातून आपल्या इगतपुरी तालुक्यातील धामणी या गावाकडे जात असताना शेनित शिवारातील कोथुळे पेट्रोल पंपाजवळ मोटार सायकल व टँकरचा भीषण झाला.

या अपघातात मोटारसायकलस्वार रामनाथ अगिवले (वय वर्ष ३०), श्री भाऊसाहेब अगीवले (वय३५) हे दोघे जागीच ठार झाले तर सुदैवाने लहान मुलगा बचावला असून त्यास दुखापत झाली आहे. आज दुपारी बारा वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला.

अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळापासून अपघातग्रस्त मोटार सायकल अधिक अंतरावर फरपटत नेली आहे. याबाबत वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनला ही माहिती समजताच पोलीस अधिकारी घटना स्थळी दाखल झाले. जवळील एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये माहिती कळवत जखमींना उपचारासाठी पाठवण्यात आले असून पुढील तपास वाडीवऱ्हे पोलीस स्टेशन करीत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!