Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Breaking : पेठ रोडला भीषण अपघात; २ ठार ९ गंभीर

Share

नाशिक। प्रतिनिधी

पेठ – नाशिक रेाडवर राशेगाव शिवारात कु्रझर व आयशर ट्रकमध्ये झालेल्या भिषण अपघातात २ ठार तर ९ जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. जखमींमध्ये पेठचे गटविकास अधिकारी (बीडीओ), पोलीस यांच्यासह बहूतांश शासकीय अधिकारी, कर्मचार्‍ यांचा सामावेश आहे.

बाळु शंकर गांगुर्डे (26, रा. पेठ), कल्पेश दत्तात्रय बोरसे (35, रा. पावरापाडा, नाचलोंडी, ता. पेठ) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

तर, योगिता पवार (30), पुष्पा अरविंद गिते (55), शिवकुमार पाल (26), शिवाजी मल्हार शिंदे (42), अभिजीत सुर्यवंशी (27, रा. औरंगाबाद), आर्थर जबारण (61, चिन्नई), संजु बाबुराव गांगुर्डे (40, रा. शेवरी, दिंडोरी), योगेश गणपत गायकवाड (27, रा. मखमलाबाद) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.

प्रत्यक्ष दर्शिने दिलेल्या माहितीनुसार पेठ येथे कार्यरत असलेले व दररोज पेठ नाशिक प्रवास करणारे कर्मचारी नेहमीप्रमाणे घरी जाण्यासाठी खासगी क्रुझर गाडीतून नाशिककडे येत होते. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास रासेगावजवळ येथे पुल ओलांडल्यानंतर पाठीमागून भरधाव आशर ट्रकने क्रुझरला कट मारला यामुळे चालकाचे नियंत्रण निसटून क्रुझर आयशरवर जाऊन आदळली.

हा अपघात इतका भिषण होता की क्रुझरचे तुकडे झाले तर आयशर पल्टी झाला. घटना घडताच भर पावसात जवळील नागरीकांनी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. खासगी वाहने तसेच १०८ अ‍ॅम्बुलन्समधून जखमींना नाशिक येथे हलविण्यात आले. क्रुझरचा चालक जागीच ठार झाला. तर बोरसेंचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!