महिंद्राची लक्झरियस एसयुव्हीचे नाशकात जल्लोषात अनावरण

0

मुंबई : महिंद्राची नवीन लक्झरियस अलटुर्स जी ४ चे त्र्यंबकरोड़ व्हील्सच्या दालनात उत्साहात अनावरण झाले.
या दमदार लक्झरियस एस यु व्हीच्या स्टार्ट मॉडेल्सची एक्स शोरूम किम्मत २६.९५ लाख इतकी असून हि भारतातील सर्वात कमी किमतीची लक्झरियस एस यु व्ही असून २ व्हील ड्राईव्ह व ४ व्हील्स ड्राईव्ह ऑटो ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध आहे

हि नवीन लक्झरियस एस यु व्ही पाच कलर व २ मॉडेल मध्ये उपलब्ध असून लक्झरी इंटेरिअर, इंडस्ट्रीमधील सर्वाधिक ग्राउंड क्लीअरन्स, ७ सीटिंग क्षमता असलेल्या या लक्झरियस एस यु व्हीमध्ये ९ एअर बॅग, ड्युअल चेम्बर एचआयडी हेडलॅम्प विथ ड्युअल फंक्शन डीआरएलएस अवॉर्ड विंनिंग QUILTED नाप्पा लेदर सीट्स , न्यू इलेकट्रीक सनरूफ विथ अनित पिंच तसेच ऑटोमॅटिक तेलगट, पुश बटन स्टार्ट स्टॉप, ८ वे ड्रायव्हर या सारख्या ऍडव्हान्स फीचर्सने परिपूर्ण असलेली हि लक्झरियस एस यु व्ही ग्राहकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल अशी माहिती भाविन व्हील्स चे एम. डी. अमिश शहा यांनी दिली. तसेच ही लक्झरि एस यु व्ही २२०० सी सी च्या दमदार इंजिन , १७८ बी एच पी चा पॉवर आणि ४२०NM चा अधिकतम टॉर्क देण्यात आला असल्याची माहिती सूत्रसंचालक शिवाजी पांडे यांनी दिली .

या लक्झरियस एस यु व्हीच्या अनावरण प्रसंगी शिवसेनेचे नाशिक मनपाचे नगरसेवक व सभागृह नेता दिलीप दातीर तसेच नाशिक मधीलच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रथम ग्राहक होण्याचा मान मिळवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सोमनाथ बोराडे तसेच भाविन व्हील्सचे सेल्स मॅनेजर राजन मल्लाह विशाल बरबंडे , विकास अहिरे शोरूमचे सर्व कर्मचारी वृंद , सन्मानीय ग्राहक , सर्व इन्शुरन्स कंपनीचे कर्मचारी तसेच फायनान्स क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्तिथ होते .

तसेच हि लक्झरियस एस यु व्ही ग्राहकांना बघण्यासाठी व टेस्ट ड्राईव्ह साठी भाविन व्हील्स च्या दालनात उपलब्ध झालेली असून अधिकाधिक ग्राहकांनी शोरूम मध्ये भेट द्यावी असे आव्हाहन भाविन व्हील्स चे माननीय शरद शहा यांनी केले.

LEAVE A REPLY

*