Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

महिंद्रा लॉजिस्टिकतर्फे सोमेश्वर येथे स्वच्छता मोहीम; वर्षातील १०० तास देणार

Share

नाशिक : मागील तीन वर्षापासून महिंद्रा लॉजिस्टिक कंपनी श्रावण मास आरंभ होण्याआधी सोमेश्वर येथील सोमेश्वर मंदिर व त्याच्या आजूबाजूच्या परिसरात स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वच्छता अभियान राबविता असते. यंदाही हा उप्र्काराम राबविण्यात येत असून कंपनीच्या कमर्चाऱ्यांसहित अधिकाऱ्यांनी यात सहभाग नोंदविला.

शहरातील महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणून सोमेश्वर ची ओळख असून या परिसरात पर्यटकांची गर्दी वाढावी या उद्देशाने महिंद्रा लॉजिस्टिकने हा उपक्रम राबवित आहे. यामध्ये कर्मचारी, अधिकारी वृंद, महिंद्रा लॉजिस्टिक्स कंपनी पार्टनर्स व त्यांचे कर्मचारी, महानगरपालिका अधिकारी, सोमेश्वर मंदिर ट्रस्ट कर्मचारी हे सर्व या उपक्रमात आवर्जून सहभागी होतात

या उपक्रमासाठी महिंद्रा लॉजिस्टिक कंपनीला नाशिक नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी व नगरपालिका कर्मचारी हे दरवर्षी झाडू, वेस्‍ट बॅग, घंटागाडी यांची सोय करून देतात. तसेच कंपनीमार्फत नागरिकांना, पर्यटकांना स्वच्छता राखण्याबाबत आवाहनही करण्यात येते.

यावेळी दीडशेहून अधिक कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सुभग घेत स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. सहभागी व्यक्तींनी देशातील स्वच्छतेसाठी वर्षातील किमान १०० तास देण्याची शपथही यावेळी घेतली.

‘स्वच्छता ही सेवा हाच आपला निर्धार’ याच आधारावर दरवर्षी अशाच प्रकारे स्वच्छ भारत अभियान राबवत राहणार अशी ग्वाही महिंद्रा लॉजिस्टिकचे अधिकारी श्री. निंबा भामरे यांनी दिली. तसेच महिंद्रा लॉजिस्टिक कंपनीने केलेल्या या उपक्रमाबद्दल आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी महिंद्रा लॉजिस्टिक चे आभार व्यक्त केले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!