महाराष्ट्र राज्य शालेय स्क्वॅश रॅकेट स्पर्धेचे उदघाटन संपन्न

0

नाशिक । स्क्वॅश रॅकेटमध्ये खेळाडूंना मोठ्या संधी असून देशात राज्याचा संघ अजिंक्य आहे. यामुळे अधिकाधीक खेळाडूंनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन विभागीय क्रीडा उपसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे यांनी येथे व्यक्त केले.
नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुलात महाराष्ट्र राज्य शालेय स्क्वॅश रॅकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उदघाटन नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे, नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

डॉ. जयप्रकाश दुबळे यांनी खेळाडूंना माार्गदर्शन करतांना सांगितले, या खेळामध्ये जास्त संधी आहे. त्यामुळे खेळाडूंनी आणि संघटकांनीही या खेळाच्या वाढीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावे . यावेळी सरचिटणीस दयानंद यांनीही खेळाडूंना या खेळाची सखोल माहिती दिली आणि या खेळात गेल्यातीन वर्षांपासून महाराष्ट्राचा संघ विजेते आहे. त्यामुळे या वेळीही खेळाडूंनी महाराष्ट्राला विजेतेपद मिळविण्यासाठी प्रत्न करावे असे आवाहन केले. तसेच शासनाने शिबीर आयोजित करून खेळाडूंना संधी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

या स्पर्धेत 14 वर्षे मुले -मुली,17 वर्षे मुले -मुली, आणि 19 वर्षे मुले -मुली अश्या तीन वयोगटाचा समावेश असून या स्पर्धेत महाराष्ट्राच्या आठ विभागाचे 240 खेळाडू सहभागी झाले आहेत. उद्या सकाळपासून तीनही गटांच्या स्पर्धा होणार आहे अशी माहिती संजय होळकर यांनी दिली. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा अधिकारी प्रकाश पवार,खिल्लारे तसेच नाशिक जिल्हा स्क्वॅश रॅकेट असोसिएशनचे सर्व सहकारी प्रत्नशील आहेत.

LEAVE A REPLY

*