Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या राजकीय

सुप्रीम कोर्टात दोन्ही पक्षांचा युक्तिवाद सुरु; अद्यापही तिढा सुटेना

Share

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तापेचावर कोर्टात सुनावणी सुरु असून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी अजित पवार यांची चिठ्ठी कोर्टात दाखल केली आहे. त्यानुसार राष्ट्रवादीच्या ५४ आमदार नेते म्हणून घोषित केले असून सरकार स्थापन करण्यासाठी अधिकृत केले आहे. म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्र्यांच्या शपथ घेण्यासाठी बोलावण्याची आमची इच्छा आहे, असे या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान महाष्ट्राच्या सत्तास्थापनचा तिढा थेट सुप्रीम कोर्टात गेला असून आज दुसऱ्या दिवशी कोर्टात सुनावणी सुरु आहे. ‘राष्ट्रपती राजवट जास्त काळ चालू नये. यासाठी मी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देण्याचं ठरवलं. राज्यपालांनी फडणवीसांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रित द्यावं,असं अजित पवारांच्या पत्रात तपशील आहे. हे पत्र सॉलिअटर जनरल तुषार मेहता यांनी कोर्टात सादर केले आहे. यावर तुषार मेहता सांगतात कि, सर्व तपशील असताना राज्यपालांनी आमंत्रण दिलं. अशाप्रकारे त्यांच्या निर्णयाला कोर्टात आव्हान कसं दिलं जाऊ शकतं? असाही सवाल त्यांनी यावेळी केला.

त्यानंतर भाजपकडून असणारे मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडताना सांगितले कि, आमच्या निवडणूकपूर्व मित्रपक्षाने साथ सोडली, मग राष्ट्रवादीने पाठिंबा दिला. आम्हाला १७० आमदारांनी पाठिंबा दिला, म्हणून राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी बोलावलं. त्यानंतर पवार कुटुंबियांमध्ये फूट पडल्याशी आमचं काही देणंघेणं नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान सुनावणी सुरु असून अद्यापही ठोस निर्णय लागला नसल्याने राजकीय सत्तानाट्यात आणखी काय वाढून ठेवलय हे लवकरच कळेल.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!