महाराष्ट्रात ‘असा’ असेल निवडणूक कार्यक्रम; उमेदवारांसाठी ‘या’ आहेत सुचना
Share

नाशिक l प्रतिनिधी
अखेर आजपासून महाराष्ट्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रातील निवडणूक कार्यक्रमही जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यातील निवडणुकांचा बार दिवाळीपूर्वीच वाजणार आहे.
दरम्यान आज दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद परिषद पार पडली. यावेळी दोन्ही राज्यांच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी केली.
निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी केलेल्या घोषणेनुसार महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान होईल तर मतमोजणी प्रक्रिया २४ तारखेला पार पडणार आहे.
महाराष्ट्रातील निवडणूक कार्यक्रम :
- महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान
- निवडणुकीची अधिसूचना जाहीर होण्याची तारीख – २७ सप्टेंबर २०१९
- उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख – ४ ऑक्टोबर २०१९
- उमेदवारी अर्जांची छाननी – ५ ऑक्टोबर २०१९
- उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत – ७ ऑक्टोबर २०१९
- २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला मतमोजणी
- मतदारसंख्या : ८ कोटी ९४ लाख
- महाराष्ट्रात १.८ लाख ईव्हिएम मशीन
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना:
- एकाच टप्प्यात संपूर्ण राज्यात मतदान
- गोंदिया गडचिरोली साठी निवडणूक आयोगाची विशेष सुरक्षा व्यवस्था
- उमेदवारी अर्ज दाखल करतांना उमेदवाराने एकही कॉलम रिकामा ठेवला तरी अर्ज बाद करण्यात येणार आहे.
- उमेदवारांना २८ लाख रुपयापर्यंत खर्च करण्याची मुभा देण्यात आली आहे.
- प्लास्टिक मुक्त प्रचारसाहित्य वापरण्याची सूचना
- उमेदवारांना गुन्ह्यांची माहिती देणे बंधनकारक