Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

महाराष्ट्र अँण्ड गोवा बार कौन्सिल निवडणुकीत अ‍ॅड जायभावे, भिडे विजयी

Share

नाशिक। प्रतिनिधी
महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीचा निकाल तब्बल सव्वा वर्षांनी लागला असून विजयी 25 उमेदवारांची नावे घोषि करण्यात आली आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यातून अ‍ॅड. जयंत जायभावे व अ‍ॅड. अविनाश भिडे विजयी झाले आहेत.

ही निवडणूक 28 मार्च 2018 रोजी आठ वर्षांनी घेण्यात आली होती. 25 सदस्यांच्या निवडीसाठी रिंगणात 164 उमेदवार होते. यामधून जिल्ह्यातून कौन्सिलचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रीय मसुदा समितीचे निमंत्रक अ‍ॅड. जयंत जायभावे, माजी सदस्य अ‍ॅड. अविनाश भिडे, नाशिक बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. दिलीप वनारसे, ऑल इंडिया वुमेन लॉयर्स संघटनेच्या माजी अध्यक्ष अ‍ॅड. इंद्रायणी पटणी, नाशिक बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आडके, अ‍ॅड. विवेकानंद जगदाळे, अ‍ॅड लिलाधर जाधव, अ‍ॅड. अनिल शालिग्राम हे आठ जण निवडणूक रिंगणात होते.

यासाठी 28 मार्च 2018 रोजी मतदान झाले. महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यांमधील 311 जिल्हा व तालुका न्यायालयांमध्ये बुधवारी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली़ यात एक लाख 12 हजार वकील मतदानाचा हक्क बजावला. यात जिल्ह्यातील वकील मतदारांची संख्या साडेचार हजार होती. जिल्ह्यात 14 केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली होती.

महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल सदस्य पदासाठीची निवडणूक प्रतिष्ठेची समजली जाते. त्यासाठी सुमारे वर्षभरापासूनच इच्छुकांनी प्रचाराला सुरुवात केली होती. प्रदीर्घ चाललेल्या या निवडणूक कार्यक्रमाने वकिलांमधून संताप व्यक्त होत आहे.

निवडणुकीद्वारे कौन्सिलचे 25 सदस्य निवडण्यात आले असून त्यामधून अध्यक्ष, उपाध्यक्ष व अन्य पदाधिकार्‍यांची निवड केली जाणार आहे. जिल्ह्यातून अ‍ॅड. जयंत जायभावे अ‍ॅड. जयंत जायभावे यांची सलग तिसर्‍यांदा तर अ‍ॅड. अविनाश भिडे याची सलग दुसर्‍यांदा निवड झाली आहे.

यामुळे लांबला निकाल
महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या मतदान प्रक्रिया व मतमोजणी यासंदर्भात राज्यभरातून विविध प्रकारच्या हरकती घेण्यात आल्या. सदरच्या हरकती निकाली काढणे अपेक्षित असताना, त्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे हरकतदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत दाद मागितली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यापूर्वी हरकतींचा निपटारा करण्याचे आदेश दिले आहेत. तोपर्यंत निकालास स्थगिती देण्यात आली होती त्यामुळे बार कौन्सिलचा निकाल बारगळा.

बार कौन्सिलचे नवनियुक्त सदस्य असे
अ‍ॅड. अविनाश देशमुख, अ‍ॅड. गजानन चव्हाण, अ‍ॅड. विठ्ठल खोंडे-देशमुख, अ‍ॅड. परिजात पांडे, अ‍ॅड. राजेंद्र उमप, अ‍ॅड. जयंत जायभावे, अ‍ॅड. हर्षद निंबाळकर, अ‍ॅड. अविनाश आव्हाड, अ‍ॅड. संग्राम देसाई, अ‍ॅड. वसंत साळुंखे, अ‍ॅड. विवेकानंद घाटगे, अ‍ॅड. मोतीसिंग मोहठा, अ‍ॅड. अण्णाराव पाटील, अ‍ॅड. आसिफ कुरेशी, अ‍ॅड. उदय वारुंजीकर, अ‍ॅड. मिलिंद पाटील, अ‍ॅड. मिलिंद ठोबडे, अ‍ॅड. अनिल गोवारदीपे, अ‍ॅड. सतिश देशमुख, अ‍ॅड. अमोल सावंत, अ‍ॅड. अविनाश भिडे, अ‍ॅड. सुभाष घाटगे, अ‍ॅड. सुदीप पासबोला, अ‍ॅड. वसंत भोसले, अ‍ॅड. अहमद खान पठाण.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!