Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

‘पवित्र’च्या लांबलेल्या शिक्षक भरतीला अखेर मुहूर्त

Share

नाशिक । शिक्षणसेवक पदासाठीच्या राज्यातील 12 हजार जागांसाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरतीप्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील पदांवर मुलाखतीविना 5 हजार 822 उमेदवारांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत.

मुलाखत घेऊन भरल्या जाणार्‍या पदांची प्रक्रिया लांबणीवर पडली होती. आता आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर या शिक्षकभरतीचा उर्वरित टप्पा पार पडणार असून त्यासाठी डिसेंबर महिन्यात कार्यवाही होणार असल्याचे संकेत शिक्षण विभागाने दिले आहेत. ’पवित्र’ वरून करण्यात येणार्‍या शिक्षक भरतीमध्ये 87 हजार उमेदवारांची नोंदणी झाली आहे.

या भरतीप्रक्रियेत प्रारंभी लोकसभा व नंतर विधानसभेच्या निवडणूक आचारसंहितेने अडथळे आणले होते. भरती प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील विविध ठिकाणच्या खासगी शाळांमधील मुलाखतीद्वारे होणारी शिक्षक भरती आता डिसेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.

शिक्षक भरतीसाठी नियुक्त्या देण्यासाठी दि.9 ऑगस्ट रोजी पहिली यादी प्रसिद्ध झाली होती. त्यातून निवड झालेल्या पात्रता धारकांच्या नियुक्त्या जिल्हा परिषद व काही संस्थांमध्ये करण्यात आल्यानंतर दुसर्‍या यादीकडे पात्रताधारक उमेदवारांचे लक्ष लागून आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मुलाखती शिवाय शिक्षक भरती करण्यासाठी उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे.

पहिल्या यादीत निवड न झालेल्या व दुसर्‍या निवड यादीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांचा विचार करण्यात आला होता. त्यातील 5हजार 822 उमेदवारांना कागदपत्रांची पडताळणी करून निर्धारित शाळांमध्ये नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत.

भरतीच्या पुढील टप्प्यात राज्यातील विविध ठिकाणच्या खासगी शाळांमधील मुलाखतीद्वारे होणारी शिक्षक भरती आता डिसेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. या साठीच्या निवड यादीत संधी न मिळालेल्या उमेदवारांनी शिक्षण विभागाकडे तक्रारी दाखल केल्या असून त्यावर या महिन्याच्या उत्तरार्धात निर्णय अपेक्षित आहे. तक्रार दाखल करणार्‍यांपैकी पात्र उमेदवारांना न्याय दिला जाईल, असे राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी सांगितले आहे. मुलाखतीसह होणारी शिक्षक भरतीची पूर्ण करण्याबाबत प्रशासनाकडून हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!