मनपा स्वत:च तपासणार गोदावरीच्या पाण्याची गुणवत्ता

0
नाशिक | आतापर्यंत गोदावरीच्या पाण्याची गुणवत्ता बाहेरील लॅबव्दारे केली जात होती. परंतु आता महापालिका स्वत: पाणी गुणवत्ता तपासणी यंत्राव्दारे गोदावरीच्या पाण्याची तपासणी रोज करणार आहे. गुणवत्ता तपासणी यंत्र खरेदीसाठी लवकरच निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या तपासणी यंत्राच्या माध्यमातून पाण्यातील बीओडी, ऑईलचे प्रमाण, प्रदूषण, पाण्यातील अन्य घटक अशा एकूण 9 प्रकारच्या तपासण्या केल्या जाणार आहे. त्याचा अहवाल रोज महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे सुर्पू करण्यात येईल. त्यावरून गोदावरीतील पाण्याची स्वच्छता तसेच अन्य गोष्टींवर काम करणे सोपे होणार आहे. सध्या महापालिका बाहेरील लॅब कडून गोदावरीच्या पाण्याची गुणवत्ता तपासून घेते.

त्यात या लॅबचे कर्मचारी रोज विविध ठिकाणच्या पाण्याचे नमुने घेत लॅबमध्ये तपासणी करतात तसा अहवाल आरोग्य विभागाला देतात. या प्रक्रियेत महापालिकेचे लाखो रूपये खर्ची पडतात. त्यामुळे महापालिका स्वत:च यावर काम करणार आहे. त्यासाठी यंत्र खरेदी केले जाणर असून या यंत्राव्दारे रोज तपासणी करण्यात येणार आहे. गोदावरीच्या पाणीप्रदूषणाबाबत विविध संस्थांनी आक्षेप नोंदविलेले आहेत.

या पाण्यामुळे होणारे आजारही वाढत आहेत. त्यामुळे भविष्यातील धोके टाळले जावेत यासाठी रोज पाण्याची तपासणी महापालिका स्वत: करणार आहे. पाण्यातील अनावश्यक घटक काढून टाकत ते स्वच्छ करण्यासाठी विविध पावले उचलली जाणार आहेत. महापालिका स्वत:च यंत्र घेणार असल्याने आता बाहेरील संस्थाना दिले जाणारे पैसेही वाचणार आहेत त्यामुळे रोजच्या रोज प्रदूषणाबाबत, तेथील पाण्याच्या घटकाबाबत माहिती मिळू शकणार आहे.

LEAVE A REPLY

*