Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

३० सेकंदात ढगांची निर्मिती करणारे महाचक्रीवादळ गुजरातला धडकणार; ८ नोव्हेंबरपर्यंत पावसाची शक्यता

Share

नाशिक : एकीकडे पाऊस महाराष्ट्राची पाठ सोडत नसतांना महाचक्रीवादळाचा फटका शेतकरी तसेच मच्छिमारांना बसणार आहे. यामुळे पुढील सहा दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

दरम्यान क्यार वादळानंतर अरबी समुद्रावर गंभीर महाचक्रीवादळ आले असून ते सध्या गुजरात किनारपट्टीच्या दक्षिणेस ५४० किमी. प्रतितास वेगाने वाहत आहे. यामुळे उत्तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणात ६ ते ८ नोव्हेंबर दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच समुद्र खवळलेला असल्याने मच्छिमारांना मासेमारी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

हे चक्रीवादळ गुजरात, कर्नाटक, गोवा या राज्यात धडकणार असून यामुळे येथील किनारपट्टीना या वादळाचा फटका बसणार आहे. ५ नोव्हेंबरच्या आसपास ही प्रणाली गुजरात किनाऱ्याकडे पूर्वोत्तर दिशेने वळेल. यामुळे केवळ ३० सेकंदात ढगांची निर्मिती होऊन पाऊस कोसळत आहे. पुढील ४८ तास कोकण आणि गुजरात किनारपट्टीवरील समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा धोका जाणवणार नसला तरी प्रभाव म्हणून पुढील तीन चार दिवस मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. परतीच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला चांगलेच झोडपले असून याचा फटका महाराष्ट्रातील ग्रामीण भागाला जास्त बसला असल्याने पिकांचे नुकसानही झाले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!