Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या राजकीय

लोकसभा २०१९ : बारामतीतून पुन्हा एकदा सुप्रिया सुळे; शिरूरला अमोल कोल्हे यांचा ऐतिहासिक विजय तर नगरला सु’वि’जय

Share

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांचे धक्कादायक निकाल समोर येत आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी आघाडीने बाजी मारली असून काही ठिकाणी राष्ट्रवादीने आपले गाद राखण्यात यशश्वी झाले आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ झाला झाल्यानंतर दुपारी अडीच वाजेनंतर निकाल येण्यास सुरवात झाली आहे. अनेक मतदारसंघातील निकाल लागत असून महत्वाच्या लढतीमधील निकाल पुढीलप्रमाणे ;

दरम्यान सुप्रिया सुळे पुन्हा एकदा बारामतीमधून विजयी झाल्या आहेत. भाजपच्या कांचन कुल यांचा प्रभाव त्यांनी करत बारामतीचा गड राखण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून रंगलेल्या आघाडी-पिछाडीच्या खेळात सुप्रिया सुळे एक लाख 54 हजार मतांनी विजयी झाल्या आहेत.

नांदेडमधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण पराभूत झाले आहेत. त्याचा पराभव भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला आहे. तर शिरूर मध्ये इतिहास घडला असून अभिनेते अमोल कोल्हे यांनी शिरुर येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे विजयी शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पत्ता गुल केला आहे.

सर्वच लक्ष लागून असलेल्या मावळ मतदासंघात पुन्हा एकदा पवार कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. निवडणूक लढवण्याच्या पर्दापणातच पार्थ पवार यांना शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी २ लाख मतांनी पराभव केला आहे.

अहमदनगरमधून भाजपचे सुजय विखे पाटील नगरमधून विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम पाटील यांचा पराभव करीत सुजय विखे नवीन यश संपादन केले आहे.

शिवसेनेचे मंत्रिपद असलेले अनंत गीते यांना रायगड मध्ये पराभव मिळाला असून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे रायगड मधून एकवीस हजार मतांनी विजयी विजयी झाले आहेत.

दरम्यान इतर मतदारसंघाचे निकाल बाकी असून देशभरातील नागरिकांना निकालाची उत्सुकता लागली आहे. देशात गेल्या महिन्याभरापासून लोकसभा निवडणूकांची धामधूम होती. रात्री आठ-नऊ वाजेपर्यंत अंतिम निकाल हाती येणार असून निकालाची देशभरात उत्सुकता आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!