डॉ. भारती पवार कमळ हाती घेणार?

0

नाशिक। प्रतिनिधी
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून राष्टलवादीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी दिसू लागताच राष्ट्रवादीच्या प्रवक्तया डॉ. भारती पवार यांनी भाजपाचे कमळ हाती घेण्याची तयारी सुरू केली आहे. भापच्या मंत्र्यांशी चर्चा करण्याबरोबरच त्यांनी आता थेट मतदार संघात जाऊन मतदारांना भावनीक आवाहन करत निर्णयाचा कौल विचारण्यास सुरूवात केली आहे. यामुळे भारती पवार यांना रोखण्याचे राष्ट्रवादी कॉग्रेससमोर मोठे आव्हान आहे.

दिंडोरीतील राष्ट्रवादीचे दिग्ज नेते माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या स्नुषा भारती पवार या राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या मागील उमेदवार होत्या. त्यांनी भाजपचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना मोदी लाटेतही चांगली लढत दिली होती. मात्र पराभवानंतरही त्यांचा मतदारसंघात वावर कायम राहिला आहे.

देशदूतच्या ताज्या घडामोडी व्हॉट्सअँपवर मिळविण्यासाठी इथे क्लिक करा

याही वेळी भारती पवार यांना दिंडोरीतून पक्षाचे उमेदवार मानले जात असताना ऐनवेळी शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांना राष्ट्रवादीने प्रवेश दिला. प्रेशासह दुसर्‍या यादीत उमेदवार म्हणून धनराज महाले यांचे नाव आज जाहिर झाले. यामुळे भारती पवार या अधिक दुखावल्या गेल्या आहेत.

महाले यांना पक्ष प्रवेश मिळाल्यामुळे भारती पवार यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत मागील पंधरवड्यात झालेल्या मेळाव्यात जाहीर नाराजी व्यक्त केली होती. तेव्हापासून त्या पक्षापासून दूर जात असल्याचे मानले जात होते. नेमका याचाच लाभ भाजपा उचलू पाहत असून, भारती पवारही भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात होत्या.

भारतीय जनता पक्षाने विद्यमान 108 खासदारांना उमेदवारी न देण्याचे ठरविल्याचे बोलले जात आहे. ज्या अर्थी भाजपाने राष्ट्रवादीच्या नाराज डॉ. भारती पवार यांच्यासाठी गळ टाकला आहे, ते पाहता दिंडोरीतून खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचा पत्ता कट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने पवार यांचा भाजपा प्रवेश व दिंडोरी मतदारसंघातून उमेदवारी, असा दुहेरी योग साधण्याचा प्रयत्न केला जात असून, तसे झाल्यास भाजपाचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या राजकीय भूमिकेकडे सार्‍यांचे लक्ष लागणार आहे.

भाजपाकडून हरिश्चंद्र चव्हाण यांना पर्याय देऊ शकणार्‍या डॉ. भारती पवार यांंना पक्षप्रवेश देण्याचे निश्चित केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पवार मुंबईत भाजपाच्या नेत्यांच्या संपर्कात असून, जोपर्यंत उमेदवारीची गॅरंटी मिळत नाही तोपर्यंत पक्षप्रवेश न करण्याचे त्यांनी ठरविले आहे. तर आता पवार यांनी उघडपणे कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन आपल्या निर्णयाचे समर्थन करताना दिसत आहेत.

तर राष्ट्रवादी कॉग्रेसचे पदाधिकारी पवार यांची मनधरणी करतानाचे आजचे चित्र होते. परंतु आता त्या कोणता झेंडा हाती घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

*