नाशिकचा रणसंग्राम : पंतप्रधान मोदी यांच्या सभेला मराठीतून सुरवात; सभेला जत्रेचे स्वरूप

0

नाशिक : नाशिक , दिंडोरी लोकसभा उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवंत प्रचारसभा होत आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी पिंपळगाव येथील सभास्थळी दाखल झाले असून थोड्यात वेळात सभेला सुरुवात होणार आहे.

दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कि, मोदी सरकारने देश भ्रष्टाचार मुक्त केला, भ्रष्टाचार केला म्हणून विरोधक कारागृहात गेले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करतांना प्रधानमंत्रीजी आपकी हवा ऐसी चल रही है की शरद पवार काय बोलतात तेच कळत नाही, पुढे ते म्हणाले कि, ६८०० कोटींच्या आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. त्यातून १७ धरणांच्या माध्यमातून नाशिकला पाणी मिळणार असून लवकरच कामाला सुरुवात होईल, असे त्यांनी यावेळी यावेळी सांगितले.

तत्पूर्वी रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले म्हणाले कि, ‘लोक म्हणतात नको आम्हाला खादी… आम्हाला हवेत मोदी’, ‘नागपूरची फारच गोड असते संत्री म्हणूनच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री’ तसेच नरेंद्र मोदी विकास पुरुष, राहुल गांधी भकास पुरुष है’, ‘बाबासाहेबांच्या संविधानाला जो विरोध करेल त्याचा सत्यानाश होईल’ अशी तुफान फटकेबाजी त्यांनी यावेळी केली. पुढे ते म्हणाले कि, मागील सरकारने ७० वर्षात काय दिवे लावले असा सवालही त्यांनी यावेळी केला. तसेच लोकसभेच्या दिंडोरी मतदारसंघाच्या उमेदवार भरती पवार म्हणाल्या कि, २९ तारखेला आशीर्वाद द्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

*