Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या राजकीय

उत्तर महाराष्ट्रात मोदी लाट अन् इतरांची लागली वाट

Share

नाशिक । कुंदन राजपूत
उत्तर महाराष्ट्रातील लोकसभेच्या आठपैकी आठही जागा जिंकत शिवसेना व भाजपा महायुतीने विजयाची तुतारी फुंकली. गत वेळी 2014 मध्ये मोदी लाटेत भाजपाने उ.महाराष्ट्रातील सर्व जागा जिंकण्याचा पराक्रम केला होता. यंदा देखील तोच कित्ता गिरवत काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीचा सुपडा साफ केला. गिरिश महाजन हे पुन्हा एकदा संकटमोचक ठरले असून उ.महाराष्ट्रात मोदी लाट अन् इतरांची लागली वाट हे दृश्य पहायला मिळाले.

उत्तर महाराष्ट्रात आठ जागा असून त्यापैकी भाजप सहा तर शिवसेनेने दोन जागावर निवडणूक लढवली. त्यापैकी नंदूरबार, धुळे, जळगाव, रावेर, दिंडोरी व दक्षिण नगर या जागेवर भाजपेच उमेदवार होते. तर, नाशिक व शिर्डी या मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे उमेदवार रिंगणात होते. यंदा काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीने आरोप – प्रत्यारोपांची राळ उडवत प्रचारात रंगत आणली होती. उत्तर महाराष्ट्राला सुरंग लावण्यासाठी महाआघाडीने दिग्गजांना प्रचारात उतरवून तोफेला बत्ती दिली होती.

मैदानात समीर भुजबळ, के.सी.पाटील, माजी मंत्री गुलाबराव पाटील यासांरखे दिग्गज मैदानात उतरवले होते. त्यामुळे महायुतीसमोर आठही जागा राखण्याचे कडवे आव्हान होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात गिरिश महाजन यांची संकटमोचक अशी प्रतिमा आहे. या प्रतिमेला तडा जाऊ न देण्याचे आव्हान त्यांच्या समोर होते. शिवाय ते महायुतीचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक देखील होते. त्यामुळे महाजन यांनी महायुतीचे उमेदवार निवडूण आणण्याचे शिवधनुष्य पेलले होते.

उ.महाराष्ट्रातील आठही जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, अशी गर्जनाच त्यांनी केली होती. मात्र, महाजन यांच्या उपस्थितीत त्यांच्या होमपिचवर झालेला ‘राडा’,.ऐनवेळी युती झाल्यामुळे दोन्ही पक्षातील बंडखोर ही आव्हाने त्यांच्या समोर होती.मात्र, महाजन यांनी संकटमोचकाप्रमाणे कामगिरी करत विजयश्री खेचून आणली. निकालाच्या दिवशी आठही जागांवर महायुतीचा भगवा फडकला. गतवेळी प्रमाणे आठही जागा ठासून जिंकण्याचा पराक्रम महायुतीने केला.

पाच खासदारांची सेंकड इनिंग
उत्तर महाराष्ट्रात महायुतीने 2014 मध्ये निवडूण आलेल्या पाच खासदारांना पुन्हा मैदानात उतरवले होते. यंदा ते विजयी होतील की पराभूत याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र, या पाचही खासदारांनी विजय मिळवत दिल्लीचे तिकीट फिक्स केले.

उत्तर महाराष्ट्रातील जागा

मतदारसंघ              विजयी उमेदवार
नाशिक            हेमंत गोडसे (शिवसेना)
दिंडोरी            डॉ.भारती पवार (भाजपा)
शिर्डी             सदाशिव लोखंडे (शिवसेना)
अ.नगर            डॉ.सुजय विखे (भाजपा)
धुळे – मालेगाव डॉ.सुभाष भामरे (भाजपा)
नंदूरबार         डॉ.हिना गावित (भाजपा)
जळगाव        उन्मेश पाटील (भाजपा)
रावेर              रक्षा खडसे (भाजपा)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!