Type to search

लोकसभा निवडणूक २०१९ : लोकांनी दिलेला कौल आम्ही स्वीकारत आहोत : शरद पवार

Breaking News maharashtra मुख्य बातम्या राजकीय

लोकसभा निवडणूक २०१९ : लोकांनी दिलेला कौल आम्ही स्वीकारत आहोत : शरद पवार

Share

नाशिक : लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये महारष्ट्रातील जनतेचा कौल आम्ही स्वीकारत आहोत. महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने लढवलेल्या काही जागांचे निकाल लागले आहेत. निवडणूक झाली आहे, निकाल लागले आहेत. पण आता लक्ष दुष्काळाकडे आहे. दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत ते पुढेही सुरूच ठेवणार आहोत असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.


दरम्यान ४८ जागांपैकी एकूण काही जागा लढवीत आहे. त्यापैकी एकूण ०८ जागा राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. तसेच महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आतापर्यंत चार जागा जिंकल्या आहेत.

परभणी, माढा मतदारसंघातील सर्व फेऱ्यांची मतदान मोजणी अद्याप बाकी आहे. या मतदारसंघांबाबत मी आशावादी आहे. लोकांनी दिलेला कौल आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत. पराभवाबाबत चिंतन करून लोकांशी संपर्क वाढवू, असे मत शारदा पवार यांनी सोशल मिडीयावर व्यक्त केले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!