Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या राजकीय

नाशिक लोकसभा मतदारसंघातील जनतेने दिलेला कौल मान्य – समीर भुजबळ

Share

नाशिक : नाशिक लोकसभा निवडणुकीत नाशिककरांनी दिलेला कौल आम्ही खुल्या मनाने स्वीकारतो निकालामुळे आमच्या जनसेवेच्या कामावर कुठलाही परिणाम होणार नसून जनसेवेचा घेतलेला वसा पुढेही अविरत सुरु राहील अशी प्रतिक्रिया समीर भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने नेहमीच जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही लढा दिला आहे आणि यापुढील काळातही तो अविरतपणे सुरु राहील. नाशिक शहर व जिल्ह्यात आम्ही अनेक विकासाची कामे केली आहे. गेल्या पाच वर्षात विकासाची ही घौडदौड पूर्णपणे थांबली होती. त्यामुळे नाशिकला पुन्हा प्रगतीपथावर नेण्यासाठी आम्ही नाशिक लोकसभा निवडणुकीला सामोरे गेलो.

संयुक्त पुरोगामी आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन प्रचार केला तसेच प्रत्येक गावागावात व खेड्या पाड्यावर जावून नागरिकांपर्यंत पक्षाची भूमिका मांडली. त्या सर्व कार्यकर्त्यांचे आम्ही मन:पूर्वक आभार मानतो. लोकशाहीत जनमताचा निर्णय सर्वोच्च आहे.

जनमताचा आम्ही आदर करतो आणि या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन करतो. या पराभवाने खचून न जाता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही पक्षाला नव्याने उभे करून जनतेच्या प्रश्नांसाठी लढा यापुढेही कायम ठेवू, त्यामुळे कार्यकर्त्यांनी खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला सुरुवात करावी असे त्यांनी म्हटले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!