भाजपची विजयी घोडदौड महाआघाडी थांबवू शकणार नाही : राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू

0

नाशिक । प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप प्रणित केंद्र शासनाविरोधात सर्वच राजकीय पक्ष एकवटले आहे.उत्तर प्रदेशात एकेकाळी कट्टर विरोधक असणारा समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षांनी एकत्र आले आहेत.विरोधी पक्ष सत्तेसाठीच महाआघाडी करत आहे. मात्र,ही महाआघाडी भाजपची विजयी घोडदौड कदापी थांबवू शकणार नाही,असा दावा भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे नाशिक, दिंडोरी,शिर्डी व नगर लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठकआयोजित करण्यात आली होती.या बैठकीसाठी नाशिक दौर्‍यावर आलेल्या जाजू यांनी ‘भारत के मन की बात’ या मुद्यावर भाजपच्या वसंत स्म्रुती कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला.

जाजू म्हणाले,काँग्रेसने प्रियंका गांधींना पुढे केले असले तरी काँग्रेसच्या या ‘प्रियंकास्त्रा’चा भाजपवर कुठलाच परिणाम होणार नाही,असे स्पष्ट करत ते म्हणाले,उत्तर प्रदेशमध्ये मतदार काँग्रेसला पुन्हा नाकारतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.भाजपतर्फे समाजातील सर्व घटकांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेण्यासाठी पक्षाने मोहीम सुरू केली आहे. केंद्र व राज्य शासनानेे विविध अनेक महत्वाकांक्षी योजनां राबविल्या असून त्यांचा देशातील नागरिकांना मोठा फायदा झाल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी शहराध्यक्ष आ.बाळासाहेब सानप,आ.देवयानी फरांदे, आ.सीमा हिरे,महापौर रंजना भानसी,लक्ष्मण सावजी,विजय साने, उपमहापौर प्रथमेश गिते , दिनकर पाटील, प्रदीप पेशकार, सुजाता करजगीकर आदी उपस्थित होते.

पक्षातर्फे सूचना पेटया
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपातर्फे प्रत्येक जिल्ह्यातील गावोगावी तसेच शहरात ठिकठिकाणी सूचनापेट्या लावण्यात येणार आहे. यातून प्राप्त झालेल्या सूचनांचा पक्षाच्या जाहिरनाम्यात समावेश केला जाणार आहे. यातून येणार्‍या समस्या सोडविण्यात प्राधान्यक्रम दिला जाणार आहे.दि.26 फेब्रुवारीला सरकारबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘कमल ज्योती संकल्प योजना’राबविली जाणार असल्याचेही जाजू यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*