Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या राजकीय

नाशिक लोकसभा 2019 : धनुष्यबाणाची चलती ; ट्रॅक्टर, कपबशीची जप्ती; 16 उमेदवारांचे डिपॉझीट जप्त

Share

नाशिक । नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे धनुष्यबाण असे काही चालले की विरोधकांची पळताभुई थोडी झाली. खा.गोडसेंच्या झंजावातात ट्रॅक्टर, कपबशी, फुगा, बॅट आदी सर्व जप्त झाले आहे. 18 उमेदवारांपैकी 16 जणांवर डिपॉझीट जप्तची नामुष्की ओढावली. राष्ट्रवादीचे घडयाळ कसेबसे डिपॉझीट वाचविण्यात यशस्वी ठरले.

निवडणुकीत जय पराजयाच्या गणितसोबत कोणाचे डिपॉझीट जप्त झाले हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता असते. त्यातही सध्या निवडणूक म्हटले की हवशे, नवशे आणि गवशे आलेच. ज्यांनी कधी साधी गल्लीतील निवडणूक लढवली नसेल असे सुध्दा आजकाल लोकसभेच्या आखाड्यात शड्डू ठोकतात. अर्थात देशात लोकशाही असल्याने कोणीही दिल्लीचे स्वप्न उघडया डोळ्यांनी बघू शकते. नाशिक लोकसभा मतदारसंघही त्यास अपवाद नाही.

नाशिकच्या रणागंणात तब्बल 18 उमेदवार मैदानात होतेे. त्यात शिवसेनेचे खा.गोेडसे, राष्ट्रवादीचे भुजबळ, भाजपचे बंडखोर अ‍ॅड.माणिकराव कोकाटे व वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार हे दिग्गज सोडले तर उर्वरीत उमेदवार नवखे होते. मोदी लाटेत देशभरात दिग्गज उमेदवारांचे डिपॉजीट जप्त झाले. तेथे नवख्याची काय गत झाली असेल हे वेगळे सांगायला नको. निवडणूक आयोगाच्या नियमानूसार डिपॉजीट वाचिवण्यासाठी उमेद्वाराला एकूण झालेल्या मतदानांपैकी एक षष्टांश मत पडले पाहिजे.

नाशिकमध्ये खा.गोडसे व राष्ट्रवादीचे समीर भुजबळ हे दोन उमेदवार तेवढी मते मिळवू शकले. उर्वरीत 16 उमेदवारांचे डिपॉजीट जप्त झाले. त्यामध्ये ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी निशाणी घेऊन लढणारे अ‍ॅड.कोकाटे, कपबशी चिन्हावर लढणारे पवन पवार यांच्यावर देखील डिपॉझीट जप्तीची नामुष्की ओढावली आहे.

दिंडोरीत सहाजणांचे वाजले बारा
दिंडोरी मतदारसंघातही नाशिकप्रमाणे दोनच उमेदवार वगळता इतर सर्वांचे डिपॉझीट जप्त झाले. भाजपा उमेदवार डॉ.भारती पवार व राष्ट्रवादीचे उमेदवार धनराज महाले हे वगळता उर्वरीत सहा उमेदवारांवर नामुष्की ओढावली. त्यामध्ये माकपचे उमेदवार आ.जीवा पांडू गावित, अपक्ष टिे.के.बागूल, अशोक जाधव, दादासाहेब पवार, बापू बर्डे याचा त्यात समावेश आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!