हतगड येथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची तपासणी

0

हतगड | लक्ष्मण पवार : दिंडोरी लोक सभा मतदारसंघात वणी सापुतारा महामार्गावर हतगड येथे सुरगाणा बोरगाव पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रत्येक वाहनांची तपासणी केली जाते .सुरगाणा ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी. वसावे,पोलीस उपनिरीक्षक दिनेश भदाणे, संतोष गवळी, यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी पथक कार्यरत आहे.

निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहितेचे काटेकोर पालनावर लक्ष ठेवण्याच्या उद्देशाने सुरगाणा तालुक्यात स्थिर
देखरेख पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकामार्फत संशयित वाहनांची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
तालुक्यात तीन स्थर पथके व दोन भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे.

वणी, सापुतारा रोडवरील हतगड .निंबारपाडा (धरमपुर),उंबरठाण(वाझदा रोड) या ठिकाणी स्थिर देखरेख पथकांमार्फत वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार मतदारसंघात येणा-या प्रत्येक वाहनाची तपासणी करून त्यामधून रोख रक्कम, मद्य, स्फोटके, शस्त्रे आदी अनधिकृत साहित्याची वाहतूक केली जात नाही, ना याची शहानिशा केली जात आहे.

यावेळी पोलीस निरीक्षक डी.वसावे, पोलीस उपनिरीक्षक दिनेश भदाणे, संतोष गवळी आदी पथक वाहनांची तपासणी करीत आहेत.

LEAVE A REPLY

*