Type to search

विरोधकाचा प्रचार न करण्यासाठीही पाकिट; प्रचारला कार्यकर्ते आव्हान

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

विरोधकाचा प्रचार न करण्यासाठीही पाकिट; प्रचारला कार्यकर्ते आव्हान

Share

नाशिक । प्रतिनिधी
लोकसभेच्या प्रचाराने वेग घेतला असून शहरामध्ये प्रचाराच्या फेर्‍या, कॉर्नर सभा होऊ लागल्या आहेत. यामध्ये स्थानिक कार्यकर्त्यांची उपस्थिती दर्शवण्यासाठी पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तरुण मंडळांपासून विविध प्रकारच्या संघटनांना सोबत घेण्यासाठी ‘अर्थ’ पूर्ण हालचाली वेगावल्या आहेत.

‘आमच्यासोबत येण्यास अडचण असेल तर त्यांच्या बाजूनेही प्रचारात उतरू नका’ आणि सभांनाही जाऊ नका, असे सांगत त्यासाठी अर्थपूर्ण घडामोडी करण्यात येत आहेत.

प्रचाराला अवघा एक आठवडा उरला असल्याने सर्वत्र जोरदार रणधुमाळी उडाली आहे. प्रत्येक पक्षाचे उमेदवार व कट्टर कार्यकर्ते झटून प्रचाराला लागले आहेत. शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून थंड असलेला प्रचार या आठवड्यात सुरू झाला आहे. काँग्रेस आघाडी व युतीच्या उमेदवारांच्या तसेच अन्य नेत्यांच्या सभा, कॉर्नर सभा, पदयात्रा सुरू झाल्या आहेत.

याशिवाय भागातील मतदान फिरवू शकणार्‍या महत्त्वाच्या कार्यकर्त्यांच्या कारभारी मंडळी भेटी घेऊ लागले आहेत. तरुण मंडळे, तालीम संस्था, विविध संघटनांच्या प्रमुखांशी गुप्त बैठका होत आहेत. प्रचाराबरोबरच मतदानादिवशी प्रत्येक भागातील मतदान केंद्रावर कार्यकर्ते गरजेचे असतात. त्यासाठीही भागातील प्रमुखांशी चर्चा केली जात आहे.

एकदा एका उमेदवाराच्या बाजूने निर्णय घेतला की, त्यांच्या प्रचाराबरोबरच मतदान प्रक्रियेपर्यंतही सोबत रहावे लागत असल्याने ‘अर्थ’पूर्ण हालचालींशिवाय बोलणी पुढे सरकत नसल्याची परिस्थिती आहे. दोन्ही बाजूंकडून ऑफर दिल्या जात असल्याने पहिल्यांदा पोहोचून तो भाग पॅक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यातील पाकिटे पोहोचवली जात आहेत.

काही मंडळी उघडपणे विरोधकांच्या प्रचारात सहभागी होऊ शकत नाहीत. पण त्यांनी दुसर्‍याच्या प्रचारातही जाऊ नये, याची काळजी घेतली जात आहे. त्यामुळे प्रचार न करण्यासाठीही पाकिटे पोहोचवली जात आहेत. कार्यकर्ता आपल्याकडे आला नाही तरी चालेल, परंतु तो विरोधी पक्षाकडे मात्र गेला नाही पाहिजे, अशा अनोख्या खेळींना आता रंगत वाढली आहे.

पडद्याआडच्या घडामोडींना वेग
जी तालीम मंडळे, तरुण मंडळे कट्टर आहेत, त्यांच्याशी फक्त चर्चा करून पुढील नियोजन दिले जात आहे. या घडामोडींमुळे गल्लींमध्ये कोण कोणाला भेटायला आले, कुणाच्या घरात बैठक झाली. यासाठी दोन्ही बाजूंकडून लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे मतदान होईपर्यंत येत्या आठवडाभर या पडद्याआडच्या हालचाली मोठ्या प्रमाणात चालणार आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!