Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या राजकीय

लोकसभा २०१९ : लोकांच्या मनात नरेंद्र मोदींची हवा नाही तर तुफान होते – रामदास आठवले

Share

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावावर सन २०१४ ची निवडणूक जिंकली मात्र आता मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार च्या कामावर २०१९ ची ही निवडणूक आम्ही जिंकली आहे.

नरेंद्र मोदींची हवा नाही म्हणणाऱ्या गांधी परिवाराचा करिष्मा देशातून संपला असून जनतेच्या मनात मोदींची केवळ हवा नव्हती तर तुफान होते हे या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी निकालाचे स्वागत करताना दिली आहे.

भाजप प्रणित एनडीए ला देशभरात ३५० पेक्षा अधिक जागा जिंकत असणारा निकाल कळल्यानंतर रामदास आठवले यांच्या बांद्रा येथील संविधान बंगल्यावर रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि लाडू वाटप करून एनडीएच्या महाविजयाचे जल्लोषात स्वागत केले. या जल्लोषात रामदास आठवले, त्यांच्या पत्नी सौ सीमाताई आठवले; पुत्र कुमार जित आठवले सहभागी झाले होते.

महाराष्ट्रात ४८ जागांपैकी ४२ जागा महायुतीने जिंकत असल्याचा निकाल येत असल्याने रामदास आठवले यांनी राज्यातील आंबेडकरी जनतेचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!