नाशिकचा रणसंग्राम : नाशिकमध्ये 18 तर दिंडोरीत 8 उमेदवार रिंगणात

0

नाशिक । प्रतिनिधी
उमेदवारी अर्ज माघारीच्या मुदतीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून नाशिक लोकसभा मतदारसंघात 18 तर, दिंडोरी मतदारसंघात 8 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. शुक्रवारी (दि.12) अंतिम मुदतीच्या दिवशी नाशिक मतदारसंघातून पाच उमेदवारांनी माघार घेतली. तर, दिंडोरी मतदारसंघातून फक्त एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला. आजपासून खर्‍या अर्थाने प्रचाराचे रणशिंग फुकले जाणार आहेत.

दोन्ही मतदारसंघात इच्छुक व बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे जिल्ह्याचे लक्ष अर्ज माघारीकडे लागून होते. नाशिकसाठी मतदारसंघासाठी तब्बल 30 उमेदवारांचे 41 अर्ज प्राप्त झाले होते. तर, दिंडोरी मतदारसंघात 15 उमेदवारांनी 27 अर्ज भरले होते. बुधवारी (दि.10) अर्ज छाननी प्रक्रियेत नाशिकमधून सात तर दिंडोरीतून सहा उमेदवारांचे अर्ज बाद ठरले.

त्यानंतर शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली होती. नाशिकमधून अपक्ष उमेदवार सीमंतनी कोकाटे, करण गायकर, राजू कटाळे, महेश आव्हाड, बन्सी रमेश यांनी माघार घेतली. दिंडोरीतून हेमराज वाघ या एकमेव उमेदवाराने माघार घेतली. माघारी नंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून नाशिकमधून 18 उमेदवार मैदानात आहे.

त्यात शिवसेना, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी,बसपा यांसह नऊ अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर दिंडोरीतून हेमराज वाघ या एकमेव उमेदवाराने माघार घेतली. दिंडोरीच्या मैदानात आता आठ उमेदवार असून भाजपच्या डॉ.पवार, राष्ट्रवादीचे महाले व माकपचे गावित यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.

LEAVE A REPLY

*