आता भारनियमनाचेही चटके; जिल्ह्यात आपत्कालीन भारनियमन सुरू

0

नाशिक । दि.4 प्रतिनिधी

वाढत्या तापमानामुळे शहरातील वीजेची मागणीही मोठया प्रमाणात वाढली आहे. मागणी जास्त अन पुरवठा कमी, कोयना येथील वीजप्रकल्प पूर्णपणे बंद, तसेच महानिर्मितीचे उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ येथील काही संच बंद पडल्याने वीजनिर्मिती कमी यामुळे नाशिक शहर आणि जिल्ह्यात आत्पकालीन भारनियमन आज (दि.4) पासून सुरू करण्यात आले आहे.

सध्या राज्यातील वीजेची मागणी 18 हजार 500 मेगावॅट इतकी आहे. परंतु त्या तुलनेत 450 ते 500 मेगावॅट वीजपुरवठा कमी होत आहे.

त्यामुळे मोठया प्रमाणावर तुटवडा भासत आहे. नाशिक जिल्हयात 900 ते 1 हजार मेगावॅट विजेची मागणी आहे. परंतु तितका विजपुरवठा होत नसल्याने जिल्हयात 6 ते 9 तास भारनियमन सुरू करण्यात आले आहे, तर शहरातही 2 तास भारनियमन सुरू झाले आहे. शहरातील सर्वच भागात विविध ठिकाणी असलेल्या फिडरला 2 तास आधी भारनियमनाची कल्पना दिली जात आहे.

वीजेची मागणी तसेच पुरवठा यात मोठी तफावत वाढल्याने पुढील काळात भारनियमन वाढण्याची शक्यता आहे. कोयना प्रकल्पातून सर्वात जास्त वीजनिर्मिती केली जाते.

परंतु सध्या हा प्रकल्प पूर्णपणे बंद असल्याने येथील वीजनिर्मिती थांबली आहे. याशिवाय महानिर्मितीच्या उत्तर महाराष्ट्रातील औष्णीक विद्युत प्रकल्पातील काही संच बंद पडल्याने विद्युतपुरवठा कमी झाला आहे.

याशिवाय विदर्भात आणि मराठवाडयात परळी येथील संचातही बिघाड झाल्याने तो दुरूस्तीसाठी आणखी सात दिवस लागणार असल्याने, एकूण वीजपुरवठा कमी झालेला आहे.

याशिवाय उन्हाच्या वाढत्या झळांमुळे घरोघरी, एसी, कुलर यामुळे देखील विजेची मागणी प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे आत्पकालीन भारनियमन सुरू करण्यात आलेले आहे.

सुरवातील शहरात दोन तास हे भारनियमन टप्प्याटप्याने सुरू झालेले आहे. फिडर निहाय ज्या भागात वसुलीचे प्रमाण सर्वात कमी त्या ठिकाणी ज्यास्त तर ज्या भागात वसुली अधिक त्या भागात कमी प्रमाणात भारनियमन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*