Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video | नाशिक : महाराष्ट्र वनविभागाकडून लघुपटामार्फत बिबट्याविषयी जनजागृती

Share

नाशिक : राज्यात प्रामुख्याने नाशिकसह अन्य वनक्षेत्रामध्ये मानवी रहिवासी भागात बिबट्यांचा वावर वाढतो आहे. यातून मानव आणि बिबट्यातील संघर्षाच्या घटना वारंवार घडत असतात.याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र वनविभागाने बिबट्याविषयी नागरिकांमध्ये स्वसंरक्षणाकरिता जनजागृती व्हावी यासाठी व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे.

दरम्यान या लघुपटाची निर्मिती ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर अधिक आहे अशा नागरिकांसाठी तसेच इतरही नागरिकासाठी आहे. या लघुपटात बिबट्याचा वावर असणाऱ्या परिक्षेत्रात काय काळजी घ्यावी असे सांगण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने
बिबट्या दिसल्यावर जोरजोराने आरडा ओरडा करावा व टाळ्या वाजवाव्यात. कोणत्याही परिस्थितीत बिबट्याचा पाठलाग करू नये जेणेकरून तो उलट हल्ला करू शकतो.

वनविभागाकडून लघुपटामार्फत बिबट्याविषयी जनजागृती (leopard Awareness )

वनविभागाकडून लघुपटामार्फत बिबट्याविषयी जनजागृती (leopard Awareness )नाशिक : राज्यात प्रामुख्याने नाशिक, ठाणे व पुणे वनक्षेत्रासह मानवी रहिवासी भागात बिबट्यांचा वावर वाढतो आहे. यातून मानव आणि बिबट्यातील संघर्षाच्या घटना वारंवार घडत असल्याने स्वसंरक्षणाकरिता जनजागृती मोहीम राबवून हा संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न वनविभागाकडून केला जातो. दरम्यान यावर आधारित महाराष्ट्र वनविभागाकडून लघुपट तयार करण्यात आलाअसून याद्वारे काय काळजी घ्यावी असे सांगण्यात आले आहे.

Deshdoot यांनी वर पोस्ट केले सोमवार, १२ ऑगस्ट, २०१९

रात्री उघड्यावर झोपू नये तसेच लहान मुलांना एकटे सोडू नये. संध्याकाळी अथवा रात्री अनावधानाने देखील एकट्याने फिरू नये, सोबतीने किंवा समूहाने वावरावे तसेच नेहमी टॉर्चचा वापर करावा. पाळीव पशूधन बंद गोठ्यात बांधण्यात यावे. शेतकाम करताना दक्ष रहावे. मानवी वस्तीजवळ पाळीव कुत्र्यांची संख्या कमी करण्यात यावी.

वनविभागक्षेत्राबाहेर बिबट्याचा वाढता वावर मानवी जिवीताकरिता धोकादायक ठरत आहे. त्यामुळे वनविभागाने हा लघुपट तयार केला असून नागरिकांनी बिबट्या वावर परिसरात सतर्क राहून स्वताची काळजी घ्यावी,असे आवाहनही या माध्यमातून करण्यात आले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!