Type to search

Featured नाशिक

Video : कारेगाव आश्रमशाळेत ‘नाशिक लीगल एड’ ची जनजागृती

Share

नाशिक | प्रतिनिधी

ठाणे जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील कारेगाव आश्रमशाळेत लैंगिक अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार यावर ‘नाशिक लीगल एड सोसायटी’कडून जनजागृती करण्यात आली. यावेळी सोसायटीच्या सोनाली शेलार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा योजना विद्यार्थ्यांसह आश्रमशाळेतील ७० ते ८० विद्यार्थी उपस्थित होते.

लहान वयात मुलामुलींचे लैंगिक शोषण झाल्याचे घटना अनेकदा समोर येतात. कुटुंबात राहून अनेक मुलामुलींवर अत्याचार होत असतात. कुटुंबातील अंतर्गत धाकाने मुलं बोलते होत नाहीत. अन्याय अत्याचार सहन करतात.

यातून मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागते. यातून वाचण्यासाठी आपण काय केले पाहिजे. कुणी आपल्याला स्पर्श केला तर तो ओळखला पाहिजे. खास करून मुलींनी यापासून कशाप्रकारे सावधानता बाळगली पाहिजे. सततच्या होत असलेल्या अत्याचाराला आपण कशाप्रकारे तोंड देऊ शकतो याबाबत जनजागृती केली.

अतिदुर्गम भागात याआधी असे कुठले व्याख्यान झाले नव्हते म्हणून विद्यार्थी बोलण्यास धजावत नव्हते. मात्र, त्यांना जेव्हा काही कार्टून्स, चित्रे सोसायटीच्या वतीने दाखविण्यात आली, तेव्हा त्यांनी मनमोकळा संवाद साधत अनेक बाबी सांगितल्या.

यावेळी सोसायटीच्या रुची भगत यांनीही विद्यार्थ्यांना घटनेने दिलेल्या अधिकारांबाबत सांगितले. या अधिकारांचा वापर करून आपण कशाप्रकारे लढा देऊ शकतो याबाबत माहिती दिली.

हा कार्यक्रम चर्चगेट येथील शासकीय विधी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कॅम्पप्रसंगी राबविण्यात आला होता. कॅम्पचाच एक भाग म्हणून या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!