Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

भावली धरणातुन इगतपुरी शहराला पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ

Share

इगतपुरी । प्रतिनिधी
इगतपुरी शहराच्या पर्यटनाच्या दृष्टीकोनातुन पाण्याचे अनन्य साधारण महत्व आहे. नवीन पाणी पुरवठा योजनेमुळे शहराला चोवीस तास होणार असुन यामुळे विकासाची दारे खुली होणार आहे असे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले. ते इगतपुरी नगर परिषदेच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत भावली धरणातुन इगतपुरी शहराला २४ तास पाणी पुरवठा योजनेचा कार्यारंभ प्रसंगी बोलत होते.

व्यासपिठावर खासदार हेंमत गोडसे, आमदार निर्मला गावित, नगराध्यक्ष संजय इंदुलकर, उपनगराध्यक्ष नईम खान, मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार मुंडे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख निवृत्ती जाधव, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश गावित आदी उपस्थित होते. इगतपुरी शहरात प्रचंड पाऊस होऊन देखील पाण्याची समस्या गंभीर आहे. या पाणीप्रश्नामुळे महिलांचे प्रचंड हाल होत असल्याचे चित्र असताना, इगतपुरीत होऊ घातलेली पाणीपुरवठा योजना महिलांसाठी नवसंजीवनी तर, शहराच्या विकासासाठी महत्वाचा दुवा ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार निर्मला गावीत यांनी व्यक्त केले. त्या इगतपुरी शहर पाणीपुरवठा योजनेच्या उदघाटन प्रसंगी बोलत होत्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हेंमत गोडसे, आमदार निर्मला गावित यांच्यासह शहरातील
सर्व आजी माजी नगरसेवक सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांच्या सहकार्यामुळे ही महत्वकांशी योजना पुर्णत्वास येत आहे अशी माहीती नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांनी दिली.

या योजनेत संपुर्ण इगतपुरी शहरास पुर्ण दाबाने ग्रॅव्हीटीने २४ तास पाणी पुरवठा करणेचे नियोजन आहे. यासाठी भावली धरणाजवळील टेकडीवर पाटबंधारे विभागाचे जागेवर फिल्टरेशन प्लांट, पाण्याची टाकी होणार असल्याची माहीती देत या योजनेचे सादरी करण मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार मुंडे यांनी केले.

दरवर्षी साडेतीन ते चार हजार मि. मीटर सर्वात जास्त पाऊस पडूनही उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाइला सामोरे जावे लागत असे. जानेवारी पासुनच शहरात आठवड्यातुन दोनदा पाणी पुरवठा करण्यात येत असे. तर मे व जुन महीन्यात आठवड्यातुन एकदाच पाणी पुरवठा करण्यात येत असल्यामुळे शहरात भीषण पाणाी टंचाई जाणवत असे. यावर उपाय योजना म्हणुन नगराध्यक्ष संजय इंदुलकर व त्यांच्या पदाधिकारी यांनी पाटबंधारे विभाग व शासनाकडे वेळोवेळी पाठपुरवठा करून भावली धरणातुन पाणी योजना मंजुर केली.

याप्रसंगी नगरपरिषदेचे मुख्य लिपीक सतिष जोशी, अभियंता प्रशांत जुन्नरे, जिवन शहा, दिपक राजपुत, यशवंत ताठे, पवन पवार, अधिकारी मंगेश सोनार, संजय पेखळे, आंनद कळमकर, सुरेखा जोगदंडकर, कर्मचारी गणपत अवघडे, हीरामण कोरडे, रफीक शेख, नागेश जाधव, प्रविण जाधव यांच्यासह नगरसेवक गजानन कदम, युवराज भोंडवे, सुनील रोकडे, सीमा जाधव, श्रीमती सबेरा पवार, उज्वला जगदाळे, अपर्णा धात्रक, आशा सोनवणे, मीना खातळे, आरती कर्पे, रोशनी परदेशी, गीता मेगाळ, नगरसेवक रंगनाथ चौधरी, दिनेश कोळेकर, किशोर बगाड, उमेश कस्तुरे, विनोद कुलथे, संपत डावखर, माजी नगरसेवक सतीश कर्पे, अलका चौधरी, राजेंद्र सोनवणे, मनिषा मोरे, शोभराज शर्मा, राजेंद्र गुप्ता, प्रल्हाद जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!