नैसर्गिक गॅसपुरवठा योजनेचा उद्या शुभारंभ; नाशिकसह सात शहरात पाईपलाईनव्दारे गॅसपुरवठा

0

नाशिक । प्रतिनिधी
स्वच्छ इंधन योजनेंतर्गत भारत सरकारमार्फत देशातील 174 शहरात नैसर्गिक गॅस पुरवठा योजना राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रात नाशिकसह सात शहरांचा या योजनेत सामावेश करण्यात आला असून याव्दारे ग्राहकांना घरपोच शाश्वत गॅसपुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेचा शुभारंभ उद्या दि. 22 रोजी होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे नाशिककरांशी संवाद साधणार आहे.

गुरूवारी मविप्रच्या राबवसाहेब थोरात सभागृहात दुपारी तीन वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, खा. हेमंत गोडसे, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी.उपस्थित राहणार आहेत. देशात 2030 पर्यंत कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण 33 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे केंद्र शासनाचे उदिदष्ट आहे. त्याअंतर्गत नैसर्गिक वायुचा पुरवठा वाढवत देशातील प्रदुषण नियंत्रण साध्य करण्यासाठी केंद्राने पुढाकार घेतला आहे.

नैसर्गिक वायुच्या वापरातून पेट्रोल डिझेलचे अवलंबित्व कमी करण्याचा या उपक्रमाचा हेतू आहे. याव्दारे वाहनचालकांना पेट्रोल, डिझेलच्या तुलनेत अवघ्या 25 ते 30 टकके खर्चात आपली इंधनाची गरज पुर्ण करता येणार आहे. उद्या पंतप्रधान मोदी हे सातही शहरांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे संवाद साधणार असून या योजनेचा शुभारंभ करण्यात येणारआहे.

या शहरात राबवणार योजना
राज्यात भारत गॅस रिर्सोसेस लि., आणि महाराष्ट्र नॅचरल गॅस लि.च्या पुढाकारातून हा उपक्रम राबविला जात आहे. नाशिकसह धुळे, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, सातारा, सांगली, नगर शहरांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. नाशिक, धुळे, सिंधुदुर्ग या तीन शहरांची जबाबदार भारत गॅस रिर्सोसेस लि., तर औरंगाबाद, सातारा, सांगली, नगर शहराची जबाबदारी महाराष्ट्र नॅचरल गॅस.लि. कडे सोपविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*