Video : त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय येथे गोवर रुबेला लसीकरण ‘शुभस्य शिघ्रम’

0

त्र्यंबकेश्वर विशेष प्रतिनिधी : त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय येथे गोवर आजाराचे निर्मुलन व रुबेला नियंत्रण या साठी लसीकरण मोहिमेची सुरवात आज पासून होत आहे. लसीकरण मोहिमेचे उद्घाटन त्र्यंबक नगरपरिषद नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांच्या हस्ते करण्यात आला.

या प्रसंगी त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ मंदाकिनी बर्वे यांनी गोवर व रुबेला आजारामुळे गरोदर महिलेस होणाऱ्या मुलास संसर्ग होऊन अर्भक मृत्यू किंवा जन्माला येणारे बाळाला जन्मजात दोष उत्पन्न होऊ शकतो. तसेच बालरोगतज्ञ डॉ राजेंद्र दुसाने यांनी गोवर व रुबेला या विषाणूजन्य आजारामुळे ९ महिने ते १५ वर्ष बालकांना अंधत्व, पंगुत्व, डायरिया, निमोनिया किंवा मतिमंदत्व असे दुष्परिणाम होऊ शकतात असे सांगितले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश मोरे यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यात त्र्यंबक तालुका लाभार्थी संख्या हि ५९ हजार ५०० असून १०० टक्के लसीकरण करण्याचे उदिष्ट या मोहिमेत पूर्ण करणार आहोत.

गोवर व रुबेला लसीकरण मोहीम उद्घाटन समारंभास त्रि.न.पा.उपनगराध्यक्ष स्वप्नील शेलार, नगरसेविका शीतल उगले, सायली शिखरे, नगरसेवक विष्णू दोबाडे तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत पाटील, डॉ विजया पवार, डॉ पकंज बोरसे, डॉ संदीप अडके, डॉ दिनेश पवार, डॉ धनंजय गायके, समीर मनियार, तुषार कोऱ्हाळे, विजय बहिरम, चंद्रकांत गामणे, उत्तम राव, संतोष दुबकवाड, आर. बी एस के टीम स्टाफ नर्स तालुका वैद्यकीय अधिकारी कर्मचारी शिक्षक विद्यार्थी, वर्कर तसेच त्र्यंबक तालुक्यातील महिला वर्ग या समारंभास उपस्थितीत होता.

त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ मंदाकिनी बर्वे यांनी ‘शुभस्य शिघ्रम’ असे म्हणत उद्घाटन समारंभ आटोपताच त्र्यंबक शहरातील कस्तुरबा गांधी विद्यालय येथे लसीकरण करण्यात आले. तसेच शाळा, विद्यालये, अंगणवाडी येथे प्रत्येकास लसीकरणाची तारीख देऊन लसीकरण करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*