त्रंबकेश्वरमध्ये सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन

0

त्र्यंबकेश्वर विशेष प्रतिनिधी : भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना गावातर्फे श्रध्दांजली वाहण्यासाठी आज सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्र्यंबकेश्वर शहर भारतीय जनता पार्टी, शहर युवा मोर्चा, नगराध्यक्ष, नगरसेवक सर्व आघाडी प्रमुख आदींनी केले होते. अध्यक्षस्थानी भाजप महाराष्ट्र प्रदेशचे चिटणीस लक्ष्मण सावजी होते.

या शोकसभेत अटलजींच्या आठवणी, त्यांचा स्वभाव, व्यक्तीमत्व, उदात्त व उच्च विचारसरणी, मुरब्बी व दुरदृष्टी असलेले राजकारणी यावर अनेक वक्त्यांनी भर दिला. यावेळी आरपीआयचे तालुकाध्यक्ष शांताराम बागुल, शिवसेनेचे भुषण अडसरे सामाजिक कार्यकर्ते उमेश सोनवणे, बाळ चांदवडकर यांनी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. विश्व हिंदु परिषदेचे गोविंदराव मुळे म्हणाले वाजपेयी प्रथम संघाच्या कामांना प्राधान्य देत असत.

यावेळी नगरसेविका मंगला आराधी, कल्पेश कदम, जेष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष बाबुराव थेटे, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर व शेवटी लक्ष्मण सावजी यांनी मनोगत व्यक्त केले. या श्रध्दांजलीपर शोकसभेसाठी शहर भाजप अध्यक्ष श्यामराव गंगापुत्र, हर्षल भालेराव, विनायक माळेकर, विष्णु दोबाडे, देवयानी निखाडे, कमलेश जोशी, विजय शिखरे, तेजस ढेरगे, प्रभावती तुंगार, नगरसेविका अनिता बागुल, शितल उगले व नगरसेवक सागर उजे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*