राज्य सरकारी कर्मचा-यांच्या संपाचा सर्वसामान्यांना फटका

0

ञ्यंबकेश्वर विशेष प्रतिनिधी : राज्य सरकारी कर्मचा-यांच्या संपाचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. ञ्यंबकेश्वर तालुक्यात ग्रामिण भागात शेतीकामांसह सर्व कामांना मंगळवार हा सुटीचा दिवस असतो. ग्रामीण भागात यास मोडा असे संबोधतात. या मोड्याच्या दिवशी ञ्यंबकेश्वर येथे आठवडे बाजार भरतो. ग्रामस्थ बाजार तसेच शासकीय कामकाजासाठी येत असतात.

सध्या शेतीकामांचा हंगाम आहे त्यामुळे मंगळवार हा एकमेव दिवस अशा कामकाजासाठी मिळतो. कालच्या मंगळवारी मात्र ग्रामीण भागातून कामकाजा निमीत्त आलेल्या ग्रामस्थांची मोठया प्रमाणात गैरसोय झाली.रेशन कार्ड,दाखले,लाभाच्या योजना आदि मिळविण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांना हातहालवत परत फिरावे लागले.

तहसील कार्यालयात तहसीलदार महेंद्र पवार यांच्या व्यतिरिक्त सर्व कर्मचारी संपावर गेल्याने शुकशुकाट होता.पंचायत समिती कार्यालयात काही कर्मचारी कामावर होते मात्र ग्रामसेवक संपात सहभागी असल्याची माहिती मिळाली.दरम्यान नगर परिषद कार्यालयातील सर्व कर्मचारी कामावर हजर होते व सर्वकामकाज नियमीत सुरू होते.

LEAVE A REPLY

*